एक अकेली ‘सिंह’

By admin | Published: October 26, 2014 12:19 AM2014-10-26T00:19:00+5:302014-10-26T00:19:00+5:30

पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला

A lone 'lion' | एक अकेली ‘सिंह’

एक अकेली ‘सिंह’

Next

अपुरे मनुष्यबळ : बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन
नरेश डोंगरे - नागपूर
पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला जाऊ शकतो. होय, निवडणुकांची रणधुमाळी असू दे की, व्हीव्हीआयपींचे दौरे, गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त, त्यात तडजोड नाहीच. हे करतानाच गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांकडेही दुर्लक्ष नाहीच ! त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. त्यामुळेच आता पोलीस दलात नागपूर ग्रामीणच्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केलेल्या बंदोबस्ताची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
अनेक दृष्टीने संवेदनशील मानला जाणारा नागपूर जिल्हा. या जिल्ह्यात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान अनुचित घटना होण्याची भीती वर्तविली जात होती. निवडणुका म्हटल्या की बोगस मतदार, पैसा, दारू आणि गुंडांच्या वापराची दाट शक्यता. नागपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून मध्यप्रदेश आहे. या प्रांतातून नागपूर जिल्ह्यात हे सर्व येणार, अशी निवडणुकीच्या अगोदर जोरदार अफवा होती. त्यात विविध गावातील काही नेते आणि त्यांच्या मागेपुढे फिरणारे गुंड यांचे आपसी वैमनस्य प्रचाराच्या निमित्ताने उफाळून येण्याचीही भीती वर्तविली जात होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या ‘बंदोबस्ता‘चे आव्हान ग्रामीण पोलिसांपुढे होते.
नागपूर शहरातही विधानसभेचे सहा मतदार संघ आहेत. येथील वातावरणही संवेदनशील होतेच. मात्र, येथे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि पोलीस अधीक्षक दर्जाचे ८ अधिकारी, सुमारे १ हजार पीएसआय ते पीआय आणि ५ हजार पोलीस कर्मचारी होते.
साऱ्यांचीच फिल्डींग
परप्रांतातून गुंड, बोगस मतदार, शस्त्रसाठा किंवा दारू आणली जाऊ नये म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या परप्रांताच्या सीमा सील केल्या. १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारले. गुंड, दारू, शस्त्र आणि रोकड पकडण्यासाठी रस्त्यारस्त्यावर फिल्डिंग लावली. हे करतानाच कुणाच्याही दडपणाला भीक घालायची नाही. कोणताच गैरप्रकार सहन करायचा नाही. धिटाईने वागायचे, असा सल्लावजा निर्देशही त्यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. त्याचे चांगले परिणाम समोर आले. दोन-एक घटनांचे अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व मतदार संघात निवडणूक शांततेत पार पडली. निवडणुकीच्या निकालानंतरही हिंसक घटना घडल्या नाहीत. ‘एक अकेला शेर काफी है जंगल के लिये‘, या उक्ती प्रमाणेच डॉ. सिंग यांनी एक कर्तव्यकठोर अधिकारी परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसा आहे, हे दाखवून दिले.

Web Title: A lone 'lion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.