जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर

By Admin | Published: September 1, 2016 07:26 PM2016-09-01T19:26:37+5:302016-09-01T19:26:37+5:30

जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली

Long time to leave water from Jaikwadi | जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर

जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 1 - जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली होती. मात्र गेल्या दोन दिवसात लाभक्षेत्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. म्हणून जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता पावसाची ओढ पडल्यावरच धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. त्यात लाभक्षेत्रातील पिके वाचविण्यासाठी जायकवाडी धरणातून तातडीने खरीपाचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय माजलगाव धरणात साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्रासाठीही ५ दलघमी पाणी सोडण्याचे निश्चित झाले. त्यानुसार औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा) कार्यालयाने जायकवाडीतून पाणी सोडण्याची तयारी केली होती. त्यानुसार २ सप्टेबर रोजी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार होते.

मात्र लाभक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांमधील बहुतेक ठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी रात्री समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले. या पार्श्वभूमिवर आता कडा कार्यालयाने जायकवाडीतून खरीपासाठी शुक्रवारी पाणी सोडण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. खरीपासाठी पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतलेले आहे. त्यानुसार लाभक्षेत्रातील खरीप पिकांना जायकवाडीतून पाणी मिळणार आहे. परंतु ते आत्ताच देण्याऐवजी आणखी काही दिवसांनी सोडले जाणार आहे.
जायकवाडीतून माजलगाव धरणातही साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्राला ५ दलघमी पाणी दिले जाणार आहे. माजलगावसाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून तर परळीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडावे लागते. खरीपासाठी दोन्ही कालवे सुरु करण्यात येणार असल्यामुळे माजलगाव आणि परळीसाठीही शुक्रवारपासूनच पाणी सोडण्याचे नियोजन होते. मात्र आता खरीपाची पाणी पाळी लांबल्यामुळे माजलगाव आणि परळीला नंतरच पाणी सोडण्यात येणार आहे.

खरीपासाठी पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाली होती. परंतु आता काही भागात पाऊस झाला आहे. सध्या पिकांसाठी पाण्याची तेवढी गरज राहिलेली नाही. म्हणून पाणी सोडणे पुढे ढकलले आहे. आणखी काही दिवसानंतर किंवा पावसाची ओढ पडल्यावर लगेचच जायकवाडीतून पाणी सोडले जाईल.
- संजय भर्गोदेव, प्रभारी अधीक्षक अभियंता, कडा

Web Title: Long time to leave water from Jaikwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.