उमेदवारांवर ‘सायबर सेल’ ठेवणार नजर
By admin | Published: January 23, 2017 09:07 PM2017-01-23T21:07:02+5:302017-01-23T21:07:02+5:30
‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून उमेदवार कसा प्रचार करत आहेत, यावर आयोगाची बारीक नजर राहणार आहे. विशेष म्हणजे ‘सायबर सेल’च्या माध्यमातूनदेखील उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ प्रचारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
Next
>उमेदवारांवर ‘सायबर सेल’ ठेवणार नजर
‘सोशल मिडीया’वर निवडणूक आयोगाची बारीक नजर : जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समिती स्थापन
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी उमेदवारांसोबतच निवडणूक आयोगदेखील सज्ज आहे. निवडणूकांच्या प्रचारपद्धतीत काळानुरुप प्रचंड बदल झाले असून ‘सोशल मिडीया’ला विशेष महत्त्व आले आहे. ‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून उमेदवार कसा प्रचार करत आहेत, यावर आयोगाची बारीक नजर राहणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘सायबर सेल’च्या माध्यमातूनदेखील उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ प्रचारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मनपा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून, सर्वच पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. मतदारराजापर्यत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर राजकीय पक्ष करत आहेत.‘ सोशल मिडिया’ व ‘मोबाईल अॅप्स’ वापरणाºयांची संख्याही प्रचंड वाढल्याने यावेळचा प्रचार हा असा बहुरंगी बनला आहे. ‘टेक्नो- सॅव्ही’ मतदारांपर्यंत पोचणे सुलभ असल्याने सर्वच पक्ष व बहुतांश उमेदवार आता ‘हाय-टेक’ प्रचारावर भर देणार आहेत.
सोशल मीडियाच्या वाढत्या वापराची दखल निवडणूक आयोगानेही घेतली आहे. उमेदवारांनी त्यांच्या ई-मेल खात्याचा तपशील आणि सोशल मीडियावर वावर असल्यास संबंधित खात्यांची पूर्ण माहिती देणे आयोगाने बंधनकारक केले आहे. त्याचप्रमाणे प्रचारासाठी केल्या जाणाºया जाहिरातींमध्ये इंटरनेट व सोशल मीडियावर केलेल्या जाहिरातींचा खर्च समाविष्ट करण्याचा स्पष्ट उल्लेख आयोगाने केला आहे.
प्रचारादरम्यान ‘सोशल मिडीया’चे महत्त्व लक्षात घेता निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समितीची स्थापना केली आहे. ‘सायबर सेल’च्या माध्यमातून उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ खात्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी दिली. निवडणूक आयोगाकडे याचा नियमित अहवाल सादर करावा लागणार आहे.
आरोप-प्रत्यारोपांवरदेखील राहणार ‘वॉच’
निवडणुकांदरम्यान प्रचाराची रणनिती म्हणून उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपदेखील होतात.‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून प्रचारादरम्यान कुणावर चिखलफेक करण्यात येत आहे का व आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे का यावरदेखील समितीचे विशेष लक्ष राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर विशेष ‘सायबर सेल’देखील स्थापन करण्यात आला आहे.