पैसे,दारु वाटपावर करडी नजर

By admin | Published: October 13, 2014 11:14 PM2014-10-13T23:14:58+5:302014-10-13T23:14:58+5:30

मतदानाचा दिवस जवळ येत चालल्यामुळे मतदारांना आणि कार्यकत्र्याना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून पैशांचे वाटप आणि दारूचे आमिष दाखवायला सुरुवात झाली आहे.

Look at the money, ammunition distribution | पैसे,दारु वाटपावर करडी नजर

पैसे,दारु वाटपावर करडी नजर

Next
पुणो : मतदानाचा दिवस जवळ येत चालल्यामुळे मतदारांना आणि कार्यकत्र्याना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून पैशांचे वाटप आणि दारूचे आमिष दाखवायला सुरुवात झाली आहे. 
पैसे आणि भेटवस्तू वाटपाच्या काही घटना उघडकीस आल्यामुळे पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी सतर्क झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या ‘स्टॅटिक सव्र्हेलन्स स्क्वॉड’कडून 
पुणो व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणावर वाहनांची कसून तपासणी सुरु 
आहे. 
त्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमण्यात आलेले तीन स्क्वॉड डोळ्यांत तेल घालून अशा घटना घडणार नाहीत याकडे लक्ष ठेवणार आहेत.
निवडणुकीचा प्रचार सुरु झाल्यानंतर दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये या स्क्वॉडकडून वाहनांची तपासणी केली जातच होती.  पुणो व पिंपरी-चिंचवडमधील अकरा मतदारसंघांमध्ये एकूण 33 स्क्वॉडकडून ही तपासणी सुरु आहे. या पथकांमध्ये निवडणूक आयोगाकडील एक अधिकारी, एक कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी आणि एक व्हिडीओ 
ग्राफर असे चार जण आहेत. शनिवारी रात्री शनिवार पेठेमध्ये पैसे आणि भेटवस्तू वाटताना काँग्रेसच्या कार्यकत्र्याना पकडल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर चौकांमध्ये चारचाकी व दुचाकी वाहनांची अधिक कडक तपासणी करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. 
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, स्टॅटीक सव्र्हेलन्सची तीन पथके,  व्हिडीओ सव्र्हेलन्स आणि फ्लाइंग स्क्वॉड अशी पाच पथके प्रत्येक मतदारसंघामध्ये  कार्यरत आहेत. 
निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या या मोहिमेमुळे पैसे आणि मद्यवाटपाला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे  विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
फक्त लाखाचीच दारू जप्त
पुणो : शहरात दारूचा महापूर वाहत असताना राज्य उत्पादनशुल्क विभागाला केवळ 1 लाख 37 हजार रूपयांची अडीच हजार लिटर दारू जप्त करता आली आहे. दुस:या शहरांबरोबरच परराज्यातूनही बेकायदेशीरपणो दारूची मोठी आवक होत असताना उत्पादनशुल्क विभागाच्या अधिका:यांना मात्र त्याची खबर लागलेली नाही. 
उत्पादनशुल्क विभागच ङिांगलेल्या अवस्थेत असून त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या कारवाईचा वेग मंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. राज्यात तब्बल 2 कोटी पेक्षा जास्त रूपयांची दारू उत्पादनशुल्क विभागाने जप्त केली असताना त्यातुलनेत पुणो विभागाची कारवाई अत्यंत तोकडी दिसून येत आहे.

 

Web Title: Look at the money, ammunition distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.