इंटिग्रेटेड प्रवेशाची पाळेमुळे शोधणार

By admin | Published: July 10, 2015 03:18 AM2015-07-10T03:18:23+5:302015-07-10T03:18:23+5:30

‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून इंटिग्रेटेड प्रवेशाच्या नावाखाली कॉलेजसोबत गुणांचे साटेलोटे करणाऱ्या खासगी क्लासेसचे पितळ उघडे पाडले.

Looking for the integration of integrated access | इंटिग्रेटेड प्रवेशाची पाळेमुळे शोधणार

इंटिग्रेटेड प्रवेशाची पाळेमुळे शोधणार

Next

मुंबई : ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून इंटिग्रेटेड प्रवेशाच्या नावाखाली कॉलेजसोबत गुणांचे साटेलोटे करणाऱ्या खासगी क्लासेसचे पितळ उघडे पाडले. त्याची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकाराची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार केला आहे.
या प्रकाराबाबत शिक्षणतज्ज्ञांकडून अहवाल मागितल्याची माहिती तावडे यांनी ‘लोकमत’ला दिली. तावडे म्हणाले की, ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर या प्रकाराची माहिती घेण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले होते. त्यानंतर मिळालेल्या माहितीत अनेक नामांकित कॉलेज आणि क्लासेस या प्रकारात सामील असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञांकडून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी अहवाल मागवण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी कशा प्रकारे वाढवता येईल, याचा विचार करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजातील कामगिरीबद्दल काही टक्के गुण देण्याचाही विचार होत आहे. शिवाय या गुणांचे वाटप थेट कॉलेज प्रशासनाऐवजी अन्य मार्गाने देता येईल का? याचीही तपासणी केली जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: Looking for the integration of integrated access

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.