आश्वासनांचे लुटले सोने!

By admin | Published: October 3, 2014 03:07 AM2014-10-03T03:07:29+5:302014-10-03T03:07:29+5:30

गांधी जयंतीच्या मुहूर्तावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले. देशात अव्वल क्रमांकाचे राज्य बनविण्याचा संकल्प काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे.

Looted gold! | आश्वासनांचे लुटले सोने!

आश्वासनांचे लुटले सोने!

Next
>जाहीरनामा जनतेसमोर
काँग्रेस देणार परवडणारी घरे
नववी पास मुलांना टॅब
राष्ट्रवादी देणार शेतक:यांना पेन्शन
बारावी उत्तीर्ण मुलांना लॅपटॉप
मुंबई : गांधी जयंतीच्या मुहूर्तावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले. सर्वसामान्यांना परवडतील अशी 1 लाख घरे, ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65वरून 6क् आणि कुणबी समाजासाठी श्यामराव पेजे आर्थिक उन्नती मंडळ स्थापणार अशा आश्वासनांबरोबरच देशात अव्वल क्रमांकाचे राज्य बनविण्याचा संकल्प काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शेतक:यांना पेन्शन,  मागेल त्याला कृषी पंपाची वीज जोडणी, सर्व एसटी स्टँडवर 2क् रुपयांत सकस जेवण आणि बारावी उत्तीर्ण विद्याथ्र्याना मोफत लॅपटॉप, अशा आश्वासनांची खैरात केली आहे.
काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खा. भालचंद्र मुणगेकर, पीरिपाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला. तर राष्ट्रवादीचा जाहीरनामा विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री आर.आर.पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. गेली पंधरा वर्षे केलेल्या कामाच्या बळावर आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असा  विश्वास दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)
 
 
काँग्रेसचा जाहीरनामा
स्मारके : छत्रपती शिवाजी महाराज, 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहल्यादेवी होळकर, लहूजी साळवे, संत गाडगेबाबा, अण्णाभाऊ साठे, जिवा महाला व वसंतराव नाईक यांची स्मारके. 
घरे : पाच वर्षात सर्वसामान्यांना परवडतील अशी एक लाख घरे म्हाडामार्फत बांधणार.
 
सर्व क्षेत्रंत नंबर वन राहण्यासाठी प्रभावी कार्यक्रम.
वीज उत्पादनात स्वयंपूर्णता व राज्य भारनियमनमुक्त.
 
सर्व मध्यम व लघुसिंचन प्रकल्प पूर्ण करणार.
शिक्षण हक्क कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होईल
 
टक्के निधीची तरतूद अर्थसंकल्पात 
दरवर्षी भटक्या विमुक्त जमातीला
 
 250 लाख रु.
घरकूल योजनेंतर्गतचे अर्थसाहाय्य करणार.
घरेलू कामगारांना वयाची 55 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकमुस्त 25 हजारांची मदत.
 
मुंबईतील धारावी पुनर्विकास आणि बीडीडी चाळीचा पुनर्विकास. प्रत्येकाला 5क्क् चौरस फुटांचे घर देणार.
 
प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडणार.
ज्येष्ठांना 6क्क्ऐवजी 
1 हजार रु. मासिक पेन्शन देणार.
महिलांसाठी विशेष पोलीस चौक्या.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा
स्मारके : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुंबईत अण्णाभाऊ साठे, कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज तर मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांची स्मारके उभारणार.
घरे : मुंबईत झोपडीवासीयांना पक्की घरे. म्हाडातर्फे परवडणारी घरे उभारणार.
 
नागपूर, नाशिक, औरंगाबादेत मोनोरेल. मुंबई-पुणो मेट्रो प्रकल्प.
 
पुढील पाच वर्षात मागेल त्याला कृषी पंपाची वीज जोडणी. सर्वाना निश्चित वेळेत अखंड वीज देणार.
 
सर्व एसटी स्टँडवर 2क् रुपयांत सकस जेवण.
 
महापालिकांमध्ये नियोजनबद्ध विकासासाठी विकास प्राधिकरणो.
 
जीवनदायी आरोग्य योजनेची मर्यादा 3 लाख रु. करणार.
इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) मंत्रलयात विभाग
पोलीस कर्मचा:यांच्या घरांसाठी मुंबईत 1क् एकर जमीन.
 
पाच वर्षात बांधणार 93 हजार किमीचे रस्ते. 1क्क्क् 
किमी लांबीचे एक्स्प्रेस-वे बांधणार.
 
सर्व महाविद्यालयांत मोफत वाय-फाय
शाळेत डिजिटल स्मार्ट क्लासरूम.
विधवा, निराधार महिलांसाठी विशेष गृहनिर्माण योजना.
 
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे
च्सच्चर समिती आणि रंगनाथ मिश्र समितीच्या शिफारशींची पूर्ण अंमलबजावणी. अल्पसंख्यकांसाठी आदिवासींच्या धर्तीवर आश्रमशाळा.
च्प्रत्येक जिलत मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक मुलामुलींसाठी सर्व सोयींनी युक्त वसतिगृहे. 
च्कुणबी समाजासाठी श्यामराव पेजे आर्थिक उन्नती मंडळ स्थापणार.
च्ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 6क् करणार
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे
च्सर्व प्रमुख शहरे विमानसेवेने जोडणार.
च्वयाची 65 वर्षे पूर्ण झालेले अल्प भूधारक, कोरडवाहू शेतकरी, शेतमुजरांना पेन्शन.
च्वृक्षलागवडीचा राज्यव्यापी कार्यक्रम राबवून ग्रीन महाराष्ट्र संकल्पना राबविणार.
 

Web Title: Looted gold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.