घराचे आमिष दाखवून लुबाडले
By Admin | Published: May 8, 2016 03:46 AM2016-05-08T03:46:18+5:302016-05-08T03:46:18+5:30
म्हाडामध्ये आमदार कोट्यातून घर मिळवून देण्याच्या नावाखाली कोटींचा गंडा घालणाऱ्या ठगाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. राजेश शिंदे असे आरोपीचे नाव
मुंबई : म्हाडामध्ये आमदार कोट्यातून घर मिळवून देण्याच्या नावाखाली कोटींचा गंडा घालणाऱ्या ठगाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. राजेश शिंदे असे आरोपीचे नाव
असून, त्याच्याकडून बनावट कागदपत्रांसह दोन वाहने जप्त करण्यात आली आहे.
म्हाडा वसाहतींमध्ये आमदारांसाठी राखीव असलेली घरे आमदार कोट्यातून मिळवून देण्याचे आमिष शिंदे दाखवत होता. बाजारभावापेक्षा कमी किमतीत घर मिळत असल्याने अनेक जण त्याच्या जाळ्यात ओढले गेले. बनावट अधिसूचनेद्वारे तो नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल होताच तपास पथकाने शोध सुरू केला. शिंदे रायगड येथील मुरूडमध्ये राहत असलेल्या आजीच्या घरी असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून शिंदेच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
शिंदे याच्या माहीम आणि प्रभादेवी येथील राहत्या घरातून एक दुचाकी आणि कार जप्त केली आहे. तसेच अनेक बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)
- म्हाडा वसाहतींमध्ये आमदारांसाठी राखीव असलेली घरे आमदार कोट्यातून मिळवून देण्याचे आमिष शिंदे दाखवत होता.
- त्याने अशा प्रकारे ११३ जणांना फसवून त्यांच्याकडून तब्बल ७ कोटी ७५ लाख रुपये
उकळले.