बँकेतून २१ लाख रुपये लुटले

By admin | Published: August 19, 2015 01:01 AM2015-08-19T01:01:30+5:302015-08-19T01:01:30+5:30

कन्नड तालुक्यातील कालीमठ येथील महाराष्ट्र बँकेतील चोरीचा तपास लागलेला नसताना फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील महाराष्ट्र

Looted Rs 21 lakh from the bank | बँकेतून २१ लाख रुपये लुटले

बँकेतून २१ लाख रुपये लुटले

Next

वडोदबाजार (जि. औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील कालीमठ येथील महाराष्ट्र बँकेतील चोरीचा तपास लागलेला नसताना फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील महाराष्ट्र बँकेवर टाकलेल्या दरोड्यात तब्बल २१ लाख रूपयांची लूट झाली. सोमवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली.
१५ आॅगस्टला ध्वजारोहण झाल्यानंतर सायंकाळी कर्मचारी बँक बंद करून गेले. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने बँक बंद होती. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेख रज्जाक यांना बँकेची खिडकी उघडी दिसल्याने संशय आला. त्यांनी बँक व्यवस्थापक व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक व बँकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी तोडून त्यातील रोख २० लाख ८४ हजार २३१ रुपये घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी वापरलेले गॅस कटर, करवत, हातमोजे पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी बँक बंद ठेवण्यात आली होती.

Web Title: Looted Rs 21 lakh from the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.