भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील - विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 06:03 AM2017-11-06T06:03:30+5:302017-11-06T06:04:05+5:30

जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे.

Lord Mahavira's thoughts will be in the world - Vijay Darda | भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील - विजय दर्डा

भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील - विजय दर्डा

Next

हिंगणघाट (वर्धा) : जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढत चालला आहे. त्यामुळे सारे विश्व अशांत झाले आहे. अशा परिस्थितीत भगवान महावीरांचे विचारच जगाला तारतील, असे प्रतिपादन सकल जैन समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. रविवारी हिंगणघाट येथे आयोजित धर्मसंमेलनात ते बोलत होते.

हिंगणघाटनजिकच्या वालधूर येथे पार्श्व पद्मावती मंदिराचे निर्माण सौभाग्यमलजी डागा परिवाराकडून करण्यात आले आहे. येथे पार्श्व पद्मावती देवीची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त येथील जैन मंदिरात धर्मसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार विजय दर्डा, आमदार समीर कुणावार, राजेंद्रकुमार डागा, डॉ. विनोद बोरा, राजेंद्र चोरडिया, अतुल कोटेचा, रितेश कोचर व मुनीराज आगमनरत्नसागरजी म.सा., मुनीराज प्रशमरत्नसागरजी म.सा., वज्ररत्नसागरजी म.सा., सुरेखाश्रीजी म.सा., चारित्ररसाश्रीजी म.सा., नवपूर्वरसाश्रीजी म.सा., श्रियमरसाश्रीजी म.सा., प्रियमरसाश्रीजी म.सा. आदी उपस्थित होते. यावेळी विजय दर्डा यांचा अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते श्रीफळ व माळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मार्गदर्शन करताना विजय दर्डा म्हणाले की, जैन साधू संतांनी प्रवचनाच्या माध्यमातून ‘जीवन जीने की कला’ शिकविण्यासोबतच पर्यावरण, हिंसाचार, अपरिणय याबाबतही संदेश समाजाला देण्याची गरज आहे. गरिबीच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी ‘जिओ जिने दो’ हा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आई ही सर्वात मोठी शिक्षक असते, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश कटारिया यांनी केले. धर्मसंमेलनापूर्वी शहरातून वरघोडा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील जैन मुनींचे दर्शन विजय दर्डा यांनी घेतले. या शोभायात्रेत जैन समाजाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जैन समाजातील सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकांना एकत्रित बांधण्याचे काम तरुणांनी करण्याची गरज आहे. नागपूर येथील यापूर्वी साध्वी प्रीतीसुधाजी यांच्या उपस्थितीत विविध पंथांतील संताना एकत्रित आणण्यात आले होते. हे काम तरुणांनी पुढे न्यावे, असे आवाहन दर्डा यांनी केले.

Web Title: Lord Mahavira's thoughts will be in the world - Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.