प्रभुंच्या रेल्वे बजेटला राजकिय वर्तुळातून समिश्र पतिसाद

By admin | Published: February 25, 2016 08:00 PM2016-02-25T20:00:36+5:302016-02-25T20:12:50+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज (गुरुवार) लोकसभेत आपला दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरेधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून विविध प्रतिक्रिया आल्या

The Lord's Railway Budget is divided by the political circle | प्रभुंच्या रेल्वे बजेटला राजकिय वर्तुळातून समिश्र पतिसाद

प्रभुंच्या रेल्वे बजेटला राजकिय वर्तुळातून समिश्र पतिसाद

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज (गुरुवार) लोकसभेत आपला दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून विविध प्रतिक्रिया आल्या. त्यामधील काही राजकीय लोकांनी अर्थसंकल्प चांगला आहे असे म्हटले तर काही जण नाराज दिसून आले. काही दिग्गज राजकिय नेत्यानी दिलेल्या प्रतिक्रिया खालिलप्रमाणे आहेत.
 
अमित शहा, भाजपचे अध्यक्ष - 
आजारी आणि दिव्यांग प्रवाशांकडे विशेष लक्ष देतानाच महिलांना कोट्यात आरक्षण देण्यात आले आहे. बंदरे रेल्वेने जोडण्यात आल्यामुळे उद्योग आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. ईशान्य आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेपर्यंत रेल्वे पोहोचविण्याचे लक्ष्य म्हणजे विशेष पाऊल ठरते.
 
नितीशकुमार, बिहारचे मुख्यमंत्री -
रेल्वे अर्थसंकल्प निराशाजनक असून त्यात स्वच्छता, सुरक्षा आणि रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत ठोस असे काहीही नाही. जागतिक बाजारात तेलाच्या किमती घसरल्या असून डिझेलचा सर्वाधिक वापर करणाऱ्या रेल्वेने प्रवास आणि मालभाडे कमी करायला हवे होते.
 
जयललिता, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री - 
रेल्वे अर्थसंकल्प तामिळनाडूतील जनतेच्या अपेक्षाला उतरू शकला नाही. चेन्नईत रेल्वे आॅटो हब तसेच प्रवासभाडे वाढ न करण्यासारख्या काही घोषणा चांगल्या आहेत. चेन्नईच्या आॅटो हबमुळे उत्पादन केंद्र बनलेल्या प्रमुख शहरांमध्ये चेन्नईला स्थान मिळेल.
 
वसुंधरा राजे, राजस्थानच्या मुख्यमंत्री -
रेल्वेचा कायापालट घडवून आणण्याच्या दिशेने ठोस पाऊल सिद्ध होईल. यापूर्वीच्या सरकारच्या तुुलनेत या रेल्वे अर्थसंकल्पात राजस्थानसाठीच्या निधीत सरासरी १८६ टक्के वाढ झाली आहे.
 
रमणसिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री.
तीन नवे रेल्वे कॉरिडॉर छत्तीसगडमधून जात आहेत. राज्य सरकारने दिलेल्या सर्व प्रस्तावांना रेल्वे अर्थसंकल्पात स्थान देण्यात आल्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानतो.
 
राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात संपूर्ण देशाची घोर निराशा केली आहे. पोकळ अर्थसंकल्प पाहता रेल्वेला प्रभुंच्या कर्तबगारीवर नव्हे तर ‘प्रभू’कृपेवरच विसंबून रहावे लागेल.महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून मोठी अपेक्षा होती. पण राज्यातील प्रलंबीत रेल्वे प्रकल्पांबाबत भरीव निर्णय झालेले नाहीत. 
 
खा. अशोक चव्हाण, महाराष्ट्र, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना करण्याऐवजी शब्दांचा खेळ करून जुन्याच योजना नव्या रूपात मांडण्यात आल्या आहेत.त्यांचा पहिला अर्थसंकल्प दिशाहिन होता आणि दुदैर्वाने दुसरा अर्थसंकल्पदेखील अपेक्षाभंग करणारा ठरला आहे.
 
धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र, विधान परिषद
मागील २-३ वर्षांचे आणि यावर्षीचे बजेट पाहता यात नवीन काहीच नाही: हे बजेट म्हणजे जुन्याच कढीला ऊत असून फक्त वाय फाय देणारे बजेट आहे. रेल्वे मंत्री राज्याचे असल्याने महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र राज्याला दिलासा देणारी एक ही मोठी बाब अर्थसंकल्पात नाही.
 
सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्रराज्य
वनपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी बजेटमध्ये प्रस्तावित केलेल्या संपूर्ण पॅकेज टूर यात्रेचे स्वागत आहे. या नवीन संकल्पनेमुळे राज्यातील वन पर्यटनात मोठी भर पडेल. प्रभू यांनी व्याघ्र संवर्धनाच्यादृष्टीने जनजागृती करण्यासाठी एक संपूर्ण पॅकेज टूर यात्रा रेल्वे अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पेंच अभयारण्याचा त्यांनी समावेश केला आहे. 
 
विनोद तावडे, महाराष्ट्र, शिक्षण मंत्री व मुंबई पालकमंत्री
सर्वसामान्यांसाठी ‘सुपर फास्ट’ असा रेल्वे अर्थसंकल्प आहे. प्रवास भाड्यात कोणतीही वाढ न करुन देशातील जनतेला प्रभु यांनी मोठा दिलासा दिला आहे. मुंबईकर आणि आसपासच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि नजिकच्या काळात त्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल.

Web Title: The Lord's Railway Budget is divided by the political circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.