काटेळपाडा रस्त्याला खो

By admin | Published: May 21, 2016 04:10 AM2016-05-21T04:10:22+5:302016-05-21T04:10:22+5:30

बोइसर विधानसभा मतदार संघात येणारे दुर्वेस काटेळपाडा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते

Lose on Katalpada road | काटेळपाडा रस्त्याला खो

काटेळपाडा रस्त्याला खो

Next


मनोर : बोइसर विधानसभा मतदार संघात येणारे दुर्वेस काटेळपाडा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र, रस्त्याची लाईन (दिशा) बदलण्यासाठी आमदार विलास तरे यांनी काम बंद करण्याचे आदेश दिले. या प्रकारामुळे काटेळपाडया पर्यंत जाणारा रस्ता अर्धवट राहीला आहे. हे काम पावसाळ्या अगोदर झाले नाही तर तेथील आदिवसींना पुन्हा चिखलातुन मार्ग काढावा लागणार आहे.
वैतरणा नदी काठी वसलेला दुर्वेस ग्रामपंचात हद्दीतील तब्बल एक हजार लोकवस्ती असलेला काटेळपाडा गेल्या अनेक वर्षापासुन रस्त्यापासुन वंचित आहे. पावसाळयात येथील आदिवासींचे रस्त्याविना खुप हाल होतात. तरे यांनीच प्रयत्न करुन १४ लाख मंजुर करून रस्ता मंजुर करुन कामही सुरू केले परंतु निम्मा बांधुन झालेल्या रस्त्याचे काम त्यांनी बंद क रण्यास सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून आजारी पडलेल्या व गरोदर स्त्रियांना पावसाळयात घोंगडीची झोळी करून दुर्वेस पर्यंत आणावे लागत होते.
तीच वेळ पुन्हा त्यांच्यावर येण्याची दाट शक्यता दिसत आहे पावसाचे आधि पुन्हा काम सुरू केले नाही तर अर्धवट केलेल्या रस्त्या पाण्यामध्ये वाहुन
जाईल लाखो रूपयांचे नुकसान होण्याची ही शक्यता नकारता येत नाही.
(वार्ताहर)
सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती
पालघर मुख्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सोनजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणले की , कार्पेट डांबरीकरण रस्त्याचे काम सुरु होते परंतु रस्त्याची दिशा बदलण्यासाठी आ. विलास तरे यांनी कांम बंद करण्यास सांगितले आहे. सदर रस्ता गावकऱ्यांच्या सोयीचा करसा होईल त्या दिशेने काम करु.
काटेळपाड्यातील ग्रामस्थांनी सुचविल्या प्रमाणे रस्त्याचे काम सुरु आहे. सध्याचा आराखडा त्यांना सोयीचा वाटत नसल्याने काम बंद आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी काम पुर्ण होईल. कुणीही गैरसमज करु नये. गावकऱ्यांचे काही प्रश्न असल्यास दुसऱ्या कुणाशी बोलण्यापेक्षा थेट माझ्याशी संपर्क साधावा. - विलास तरे, आमदार

Web Title: Lose on Katalpada road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.