प्युरीफायरच्या स्वच्छतेलाच खो!

By admin | Published: September 14, 2014 12:49 AM2014-09-14T00:49:27+5:302014-09-14T00:49:27+5:30

मुंबईतील अनेक खासगी कार्यालयांमध्ये कर्मचा:यांना प्यायला देण्यात येणा:या पाण्याविषयी अनास्था असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Lose the purifiers cleanliness! | प्युरीफायरच्या स्वच्छतेलाच खो!

प्युरीफायरच्या स्वच्छतेलाच खो!

Next
पूजा दामले - मुंबई 
दूषित पाणी प्यायल्यामुळे कावीळ, टायफॉईड, उलटय़ा, जुलाब असे आजार होतात, पावसाळ्यात विशेष काळजी घेतली पाहिजे, अशी जनजागृती एकीकडे महापालिका करते. दुसरीकडे मात्र मुंबईतील अनेक खासगी कार्यालयांमध्ये कर्मचा:यांना प्यायला देण्यात येणा:या पाण्याविषयी अनास्था असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. 49 टक्के कार्यालयांमध्ये वर्षातून एकदाच वॉटर प्युरीफायर स्वच्छ केला जातो, असे दिसून आले आहे.
कर्मचा:यांसाठी कोणत्या सुविधा उत्तम आहेत, याचा विचार कार्यालयाचा एचआर किंवा प्रशासकीय विभाग करत असतो. मात्र त्याचवेळी कर्मचा:यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे ‘पिण्याचे पाणी’ या घटकाकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. एमजीएम स्कूल ऑफ हेल्थ मॅनेजमेंट अॅण्ड स्टडिज् येथील विद्याथ्र्यानी मुंबईतील 52 कॉर्पोरेट कार्यालयांमधील पिण्याच्या पाण्याचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ज्या कार्यालयात प्रशासकीय विभागाकडे पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी असते, यापैकी 72.5 टक्के प्रशासकीय विभागांना पाण्यामुळे कोणताच संसर्ग होत नाही असे वाटते. 
स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यायला मिळावे म्हणून अनेक कार्यालयांमध्ये वॉटर प्युरीफायर असतात. मात्र यापैकी 49 टक्के कार्यालयांमध्ये वॉटर प्युरीफायर हा वर्षातून एकदाच स्वच्छ करण्यात येतो. वास्तविक तीन महिन्यांनी एकदा वॉटर प्युरीफायर स्वच्छ करणो अपेक्षित आहे. एक वर्षभर स्वच्छ न केल्यामुळे तिथे घाण जमणो सहज शक्य आहे. यामुळे या कार्यालयात असेच पाणी प्यायले जाते. (प्रतिनिधी)
 
मुंबईतील कॉर्पोरेट कार्यालयातील कर्मचा:यांना पुरवल्या जाणा:या पिण्याच्या पाण्याची जबाबदारी प्रशासकीय विभागावर आहे.
 
प्रशासकीय विभागाने पाण्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही, असे मत व्यक्त केले आहे.
 
कार्यालयांत वॉटर प्युरीफायर वापरतात, तर 35 टक्के कार्यालयांत पाण्यासाठी बाटल्यांचा वापर केला जातो. 
 
75 टक्के कार्यालये ही वर्षातून एकदाच वॉटर प्युरीफायर साफ करतात. म्हणजे एकूण कॉर्पोरेट कार्यालयांपैकी फक्त 49 टक्के कार्यालये वर्षातून एकदाच वॉटर प्युरीफायर साफ करतात.
 
कुठल्या विभागातील कार्यालये - नरिमन पॉइंट, बीकेसी, अंधेरी, मालाड. एमजीएम स्कूल ऑफ हेल्थ मॅनेजमेंट अॅण्ड स्टडीज्च्या विद्याथ्र्यानी मुंबईतील कॉर्पाेरेट कार्यालयांत पिण्याच्या पाण्यासंबंधी किती जनजागृती आहे? याविषयी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात आढळून आलेली निरीक्षणो 
 
काही कार्यालयांमध्ये बाटली बंद पाण्याचा उपयोग केला जातो. मात्र ते पाणी किती शुद्ध असते, त्याचे निकष काय याविषयी सर्वच जण अनभिज्ञ आहेत. पाण्याच्या दर्जाविषयी काही संस्था अहवाल सादर करतात याविषयी कोणालाच माहिती नाही. 
 
आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी हा महत्त्वाचा घटक असूनही खासगी कार्यालये त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे, कर्मचा:यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र सर्वेक्षणातून दिसून आले आहे.  
 
अहवालाविषयी कोणालाच काही माहीत नाही. 
काही संस्था या विकत मिळणा:या पिण्याच्या पाण्याविषयी अहवाल सादर करतात. यामध्ये पाण्याचा दर्जा चांगला आहे की नाही याचे मूल्यमापन केले जाते, या अहवालाविषयी कोणालाच काही माहीत नाही. 
 
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
कावीळ, कॉलरा, टायफॉईड, उलटय़ा, जुलाब 
 
कार्यालयांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात
1दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात, त्याचे दुष्परिणाम काय याविषयी कार्यालयाच्या प्रशासकीय आणि एचआर विभागाला माहिती असणो गरजेचे आहे.
2कर्मचा:यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी कर्मचारी पीत आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे. कर्मचा:यांना स्वच्छ, शुद्ध पाणी प्यायला दिले पाहिजे.
3पिण्याच्या पाण्याच्या दर्जाविषयी येणारे अहवाल पाहून त्यानुसार पिण्याच्या पाण्यात बदल केले पाहिजेत.
4नियमितपणो वॉटर प्युरीफायर स्वच्छ केला पाहिजे. कर्मचा:यांना पिण्यासाठी कोणते पाणी दिले जात आहे, याविषयी कर्मचा:यांना माहिती असणो गरजेचे आहे.
 

 

Web Title: Lose the purifiers cleanliness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.