नळांना तोट्या बसवा... पाणी वाचवा!

By Admin | Published: May 14, 2016 02:58 AM2016-05-14T02:58:06+5:302016-05-14T02:58:06+5:30

सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Lose the taps ... save the water! | नळांना तोट्या बसवा... पाणी वाचवा!

नळांना तोट्या बसवा... पाणी वाचवा!

googlenewsNext

मुंबई : सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातारा, सोलापूर, औरंगाबाद आदी शहरात हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
पाण्याचे महत्त्व आता कळून चुकल्याने सातारा शहरातील युवक, महिला पाणी बचतीसाठी विविध उपाय करत आहेत. निमिश शहा यांनी शहरातील विविध भागांतील नळांना तोट्या बसवून वाया जाणारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याचे मोल समजू लागले आहे. त्यामुळे पाणी बचतीची चळवळ सुरू झाली आहे. ‘जलमित्र अभियान’अंतर्गत साताऱ्यातील निमिश शहा यांनी मित्रांना घेऊन सदर बझार येथील हौसिंग सोेसायटी, बंगले, झोपडपट्टी या भागात फिरून तोट्या नसलेल्या नळांचा सर्व्हे केला. त्यानंतर एक प्लंबर बरोबर घेऊन त्यांनी जवळपास वीस नळांना तोट्या बसविल्या.
जलसाक्षरतेसाठी औरंगाबाद येथील जलमित्र समोर आले आहेत. ज्यांच्याकडील नळाची तोटी खराब असेल, पाईपमधून पाणी गळत असेल, अशा नागरिकांनी जर या जलमित्रांना फोन केला तर हे जलमित्र येऊन कोणतेही शुल्क न घेता ते दुरुस्त करून देत आहेत. शेकडो लिटर पाणी वाया जाऊ नये, यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात औरंगाबादचे मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आवाहन केले आहे की, नळाची तोटी खराब आहे, तिची दुरुस्ती होत नसल्याने शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे. दुरुस्तीअभावी जर पाणी वाया जात असेल तर हे दुर्दैव आहे. यासाठी आम्ही प्लंबरचे पथक तयार केले आहे.
सोलापुरात शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीने सार्वजनिक नळांना तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेतली. आजवर या ग्रुपच्या वतीने किशननगर, मौलाली चौक, कुर्बान हुसेननगर आदी भागातील ७० नळांना तोट्या बसविण्यात आल्याची माहिती रसूल पठाण यांनी ‘लोकमत’ ला दिली. (प्रतिनिधी)पाणीटंचाई यू ट्यूबवर : पाणीटंचाईच्या दाहकतेचे चित्र समोर येण्यासाठी जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील स्वराज्य पथनाट्य गु्रपच्या काही तरुणांनी एकत्रित येऊन जनजागृतीपर गाण्याचा व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड केला आहे. यू ट्यूबवर ‘सेव्ह द ट्री, सेव्ह द वॉटर, एमजेसी जळगाव’ ही लिंक टाकल्यास हा चार मिनिटांचा व्हिडीओ पाहावयास मिळतो. सध्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
लक्षवेधी : जागतिक तज्ज्ञांच्या मते भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १५० कोटी होणार आहे. माणसाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी माणसी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरलं जातं. नागपूर, पुणे आणि मुंबईसारख्या शहरात हेच प्रमाण २०० लिटरपर्यंत आहे. पाण्याचा असाच वापर होत राहिल्यास पाणी समस्या आणखी उग्र होणार आहे.

Web Title: Lose the taps ... save the water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.