हरवलेले आजोबा सुखरूप घरी परतले

By admin | Published: March 3, 2016 04:19 AM2016-03-03T04:19:39+5:302016-03-03T04:19:39+5:30

मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या धर्मराज रामलिंग देशमुख या ज्येष्ठ नागरिकाला बीडमधील त्यांच्या राहत्या घरी सुखरुप पोहचविण्याची उल्लेखनीय कामगिरी दीपक गोरेवार या मुंबईकराने केली आहे.

The lost grandfather returns home safely | हरवलेले आजोबा सुखरूप घरी परतले

हरवलेले आजोबा सुखरूप घरी परतले

Next

मुंबई : मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या धर्मराज रामलिंग देशमुख या ज्येष्ठ नागरिकाला बीडमधील त्यांच्या राहत्या घरी सुखरुप पोहचविण्याची उल्लेखनीय कामगिरी दीपक गोरेवार या मुंबईकराने केली आहे.
२० फेब्रुवारी रोजी नोकरीवर जाताना दीपक यांना चेंबूरमधील विष्णूनगर येथे एक वयस्कर गृहस्थ अस्वस्थ असल्याचे दिसले. त्यांच्याविषयी काळजी निर्माण झाल्यानंतर त्याने चौकशी केली. मात्र त्यांच्याकडून नावशिवाय त्यांना काहीच मिळत नव्हती. त्यामुळे केवळ नावावरच त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे दीपकने ठरवले. त्यानंतर तो त्यांच्याशी दररोज संवाद साधू लागला. संवादावेळी आपल्या आणि त्यांच्या भाषेत दीपकला साधर्म्य आढळले. शिवाय त्यांच्याकडून काही गावांची माहिती मिळू लागली. यावरून दीपकने अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकाबद्दल विचारणा केली. अखेरीस त्यांनी ‘माकेगाव’ असा शब्द उच्चारल्यानंतर त्याविषयी शोध घेण्यात आला. बीड जिल्ह्यात आंबेजोगाई तालुक्यात हे गाव असल्याचे समजल्यावर तेथील कृषी समितीशी संपर्क साधण्यात आला. शिवाय तेथील पोलिसांशी संपर्क साधत त्यांनी देशमुख यांची चौकशी करत पत्ता मिळवला. आणि तब्बल ८ महिन्यांपासून मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या या ज्येष्ठ नागरिकास त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.
मुंबईच्या गर्दीत अनेक माणसे भरकटलेली आढळतात. त्यांचे मानसिक संतुलनही बिघडलेले असते. अशांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचा प्रयत्न सगळ््यांनी करायला पाहिजे.
- दीपक गोरेवार
पंढरपूर यात्रेसाठी गेलेले सासरे घरी परतलेच नाही. त्यांच्या हरवण्याची तक्रार पोलीसांत केली होती. ८ महिन्यांपूर्वी हरवलेले सासरे परत येतील, अशी अपेक्षा होती. दीपक गोरेवार यांच्या मेहनतीमुळे सासरे सुखरुप परतले.
- प्रियंका देशमुख,
धर्मराज देशमुख यांची सून

Web Title: The lost grandfather returns home safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.