लॉटरीची लालसा पडली महागात, रेल्वे कर्मचा-याला २० लाखांचा गंडा

By admin | Published: June 29, 2016 04:36 PM2016-06-29T16:36:41+5:302016-06-29T16:40:11+5:30

अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याबाबत आलेल्या ‘एसएमएस’ला प्रतिसाद देणे एका रेल्वे कर्मचा-ला चांगलेच महागात पडले असून त्याला २० लाखांचे नुकसान सहन करावे लागले.

Lot of money looted, Rs 20 lakh to railway staff | लॉटरीची लालसा पडली महागात, रेल्वे कर्मचा-याला २० लाखांचा गंडा

लॉटरीची लालसा पडली महागात, रेल्वे कर्मचा-याला २० लाखांचा गंडा

Next
>ऑनलाइन लोकमत
मलकापूर, दि. २९ -  अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याबाबत आलेल्या ‘एसएमएस’ला प्रतिसाद देणे एका रेल्वे कर्मचा-ला चांगलेच महागात पडले. शासकीय सेवेत असलेल्या शिवाजी रामभाऊ राऊत यांची लॉटरी प्रकरणात २० लाख रुपयाने फसवणूक झाली असून या संदर्भात त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन मलकापूर पोलिसांनी १७ खातेदारांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
मलकापूर शहरातील विष्णु नगर येथील शिवाजी रामभाऊ राऊत हे बोदवड येथे रेल्वे विभागात कार्यरत आहेत. एक वस राऊत यांना अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचा एसएमएस त्यांच्या मोबाईलवर मिळाला. तसेच मोबाईल व लॅपटॉपचे बक्षीस  मिळणार असल्याचा संदेशही मिळाला. त्या मेसेजनुसार शिवाजी राऊतने शेगाव येथील ‘एसबीआय’ बँकेच्या शाखेमधून सूचविण्यात आलेल्या संबंधीत बँक खात्यात २५ हजार रुपयांची रक्कम जमा केली. मात्र कोणतेही पार्सल त्याला मिळाले नाही. उलट वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असलेल्या खात्यांमध्ये आणखी रक्कम भरण्याच्या सूचना राऊतला देण्यात आल्या. याबाबत सुध्दा काहीही शहानिशा न करता अडीच कोटीच्या लालसेपोटी राऊतने विविध खात्यांमध्ये १२ लाख रुपये जमा केले. 
यानंतर लॉटरीचे पैसे केव्हा मिळणार? याची विचारणा संबंधितांना केली असता तुमच्या नावाने आरबीआयमध्ये खाते उघडण्यात आले असून सदर रक्कम दिल्लीला मिळणार असल्याचे तथाकथीत सॅमसंग कंपनीमधील अधिकाºयांकडून सांगण्यात आले. त्यानुसार राऊत दिल्लीला पोहोचला व सुचविण्यात  आलेल्या पत्यावर कंपनीच्या अधिकाºयांना भेटण्यासाठी गेला. यावेळी मात्र राऊतला मोठा धक्का बसला. कारण सॅमसंग कंपनीच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे राऊतला समजले होते. तरीही पैशाच्या हव्यासापोटी राऊतने पुन्हा सूचविण्यात आलेल्या वेगवेगळ्या खात्यांवर ७ लक्ष रुपये जमा केले. अशाप्रकारे  १९ लाख २५ हजार रुपयांचा भरणा केल्यानंतरही लॉटरीची कोणतीही रक्कम मिळत नसल्याने अखेर शिवाजी राऊतने पोलिस स्टेशनला धाव घेतली पोलिसांनी राऊतच्या तक्रारीवरुन १७ जणांविरुध्द कलम ४२०, ४६८, ४७१, १२० ब भादंवि सहकलम ६६ ड आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील संबंधित विविध व्यक्तींच्या बँक खात्यांची डिटेल्स घेणे, फसगत झालेल्या व्यक्तीला आलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स उपलब्ध करून घेणे तसेच संगणकामधील आय.पी. अ‍ॅड्रेस व आय.डी. चेक करणे सुरू केले आहे. तपासासाठी दिल्लीला देखील एक पथक पाठविण्यात येणार आहे.
- महेंद्र देशमुख पोलीस निरीक्षक शहर पो.स्टे. मलकापूर 
 
 दोन एकर शेतीही विकली
तथाकथीत कंपनीच्या अधिकाºयांकडून वारंवार होणारी पैशाची मागणी पूर्ण केल्यानंतरही आणखी ७ लक्ष रुपयांसाठी शिवाजी राऊतने २ एकर शेतीही विकली आहे. शिवाजी राऊतने १२ लक्ष रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. त्यानंतर आणखी ७ लाखाची मागणी तथाकथीत अधिका-यांकडून करण्यात आली. पैशाची जुळवाजुळव होत नसल्याने शिवाजी राऊतने अखेर ९ लक्ष रुपयात २ एकर शेती विकली व या रक्कमेतील ७ लक्ष रुपये पुन्हा विविध खात्यांमध्ये जमा केले आहेत.
 
तोतया सीबीआय अधिकारीच मुख्य सूत्रधार !
अडीच कोटी रुपये मिळविण्यासाठी १५-२० लाख रुपये खर्च करण्याची तयारी शिवाजी राऊतने दाखविली. त्यामुळे शिवाजी राऊतचा पूर्ण विश्वास बसावा यासाठी एकाने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून शिवाजी राऊतला बनावट ओळखपत्र देखील पाठविले. ब-याच कालावधीनंतर लॉटरीचे पैसे मिळत नसल्यामुळे राऊतने सदर सीबीआय अधिकाºयाची माहिती काढली असता सदर ओळखपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तोतया सीबीआय अधिकारीच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Lot of money looted, Rs 20 lakh to railway staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.