लांब पल्याच्या मार्गावरील प्रवाशांचे हाल

By admin | Published: August 6, 2015 01:20 AM2015-08-06T01:20:05+5:302015-08-06T01:20:05+5:30

मध्य प्रदेशातील हरदा येथे मंगळवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात दोन एक्सप्रेस रुळावरुन घसरल्या. यात मुंबईहून निघालेल्या कामयानी एक्सप्रेसचे ११ डबे तर मुंबईच्या दिशेने

A lot of people on the long run | लांब पल्याच्या मार्गावरील प्रवाशांचे हाल

लांब पल्याच्या मार्गावरील प्रवाशांचे हाल

Next

मुंबई : मध्य प्रदेशातील हरदा येथे मंगळवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात दोन एक्सप्रेस रुळावरुन घसरल्या. यात मुंबईहून निघालेल्या कामयानी एक्सप्रेसचे ११ डबे तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या राजेन्द्रनगर जनता एक्सप्रेसचे चार डबे आणि एक इंजिन रुळावरुन घसरले. यामुळे मुंबईतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक मेल-एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम झाला असून काही रद्द करण्यात आल्याची माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. रद्द करण्यात आलेल्या ट्रेनमुळे सीएसटी आणि एलटीटीवर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांचे हाल झाले.
मध्य प्रदेशात रात्री झालेल्या अपघातात दोन ट्रेनचे एकूण १६ डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे अनेक मेल-एक्सप्रेस ट्रेनवर परिणाम झाला असून मुंबईतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रेन रद्द करतानाच काही ट्रेन या दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. एलटीटी आणि सीएसटीहून सुटणाऱ्या तर १९ ट्रेन रद्द करण्यात आल्या असून ३५ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहीती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. यामध्ये मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-लखनौ सुपरफास्ट एक्सप्रेस, एलटीटी-राजेन्द्र नगर एक्सप्रेस, हसरत निजामुद्दीन-एलटीटी एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे.
म.रे.कडून हेल्पलाईन सेवा
मध्य रेल्वेकडून सीएसटी, एलटीटी, ठाणे आणि कल्याणमध्ये हेल्पलाईन सेवा सुरु केली.
च्सीएसटी- 0२२-२२६९४0४0
च्एलटीटी- 0२२-२५२८000५
च्ठाणे- 0२२-२५३३४८४0
च्कल्याण- 0२५१-२३११४९९

(प्रतिनिधी)

Web Title: A lot of people on the long run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.