लॉटरीमुळे राज्याला मोठं उत्पन्न मिळाले - जयंत पाटील

By admin | Published: July 5, 2016 03:21 PM2016-07-05T15:21:38+5:302016-07-05T16:14:48+5:30

अब्जावधींच्या ऑनलाईन लॉटरी घोटाळ्यात नाव आल्यानंतर अडचणीच आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज प्तरकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत

The lottery generated by the lotteries - Jayant Patil | लॉटरीमुळे राज्याला मोठं उत्पन्न मिळाले - जयंत पाटील

लॉटरीमुळे राज्याला मोठं उत्पन्न मिळाले - जयंत पाटील

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 : अब्जावधींच्या ऑनलाईन लॉटरी घोटाळ्यात नाव आल्यानंतर अडचणीच आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज प्तरकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत आपण राज्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ दिलं नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. लॉटरी बाबतच्या सर्व प्रक्रिया नियमानुसार, कोर्टात अपयश आल्यावर 2 अंकी लॉटरी सुरु केल्या. राज्याची ऑनलाइन लॉटरी 4 महिन्यात बंद पडली असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, लॉटरीमुळे राज्याला मोठ उत्पन्न मिळाले, माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. लॉटरीबाबतची सर्व प्रक्रिया नियमानुसार केली आहे. घोटाळ्याचा आरोप झालेली लॉटरी फक्त १५ महिनेच चालली होती. नियमानुसार टेंडर काढून एजंटची निवड केली होती.
आघाडी सरकारच्या काळात 2001 ते 2009 मध्ये राज्यात अब्जावधींचा ऑनलाईन घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट माजी आयएएस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. या घोटाळ्यात नाव घेण्यात आलं आहे.

Web Title: The lottery generated by the lotteries - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.