पुण्यातील ५ हजार घरांची  २९ जुलैला निघणार सोडत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 08:57 AM2022-06-10T08:57:43+5:302022-06-10T08:58:25+5:30

दि. ९ जून रोजी सायंकाळी ५ पासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. ९ जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार १० जून रोजी सकाळी १० पासून अर्ज करू शकतील.

lottery of 5,000 houses in Pune on July 29 | पुण्यातील ५ हजार घरांची  २९ जुलैला निघणार सोडत

पुण्यातील ५ हजार घरांची  २९ जुलैला निघणार सोडत

Next

मुंबई : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ६९ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते गुरुवारी गो-लाईव्ह कार्यक्रमांतर्गत सुरुवात झाली. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकरनगर येथील कार्यालयात काढली जाणार आहे.
दि. ९ जून रोजी सायंकाळी ५ पासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. ९ जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार १० जून रोजी सकाळी १० पासून अर्ज करू शकतील. १० जुलै रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज  सादर करता येणार आहे. ११ जुलै रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. १२ जुलै रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी २१ जुलै रोजी सायंकाळी  ६ वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. 

- सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण १९४५ सदनिकांचा सोडतीत समावेश
- पुणे महापालिकेच्या हद्दीत ५७५ सदनिका
- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १३७० सदनिका
- म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत २७९ सदनिका
- प्रधानमंत्री आवास योजनेतील १७० सदनिका
- म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २ हजार ६७५ सदनिका. 

Web Title: lottery of 5,000 houses in Pune on July 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा