गिरणी कामगारांसाठी लॉटरी २२ एप्रिल रोजी
By admin | Published: April 19, 2016 03:50 AM2016-04-19T03:50:04+5:302016-04-19T03:50:04+5:30
गिरणी कामगारांच्या २ हजार ६७८ घरांसाठीची जाहिरात २२ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य मुंबईकरांसाठीच्या सुमारे एक हजार घरांसाठीच्या लॉटरीची जाहिरात
मुंबई : गिरणी कामगारांच्या २ हजार ६७८ घरांसाठीची जाहिरात २२ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य मुंबईकरांसाठीच्या सुमारे एक हजार घरांसाठीच्या लॉटरीची जाहिरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे.
वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात ‘म्हाडातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या एक वर्षाच्या बालसंगोपन’ रजेबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत म्हाडाचे उपाध्यक्ष एस.एस. झेंडे यांना प्रसारमाध्यमांनी घरांच्या लॉटरीबाबत विचारले. यावर झेंडे यांनी गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांच्या घरांच्या लॉटरीचीही माहिती दिली.
झेंडे म्हणाले की, ‘पहिल्यांदा गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, सर्वसामान्य घरांसाठीच्या लॉटरीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.’
मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून पहिल्या आठवड्यात या घरांची लॉटरी निघेल. सर्वसामान्यांसाठी सुमारे एक हजार घरे असण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये लॉटरीसाठीची सर्वाधिक घरे असणार असून, गोरेगाव येथील सिद्धार्थनगर एक आणि दोनमधील
घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)