‘कमळ’ वाहिले बाप्पाला आरती करतच राहणार!

By admin | Published: September 5, 2014 12:59 AM2014-09-05T00:59:09+5:302014-09-05T00:59:09+5:30

इच्छुक असलेल्या कार्यकत्र्यामधील हालचालींचा मागोवा घेतला जात असून, भाजपामधील कोणत्या नेत्याला कोण भेटले, याची कुजबूज वेगळ्या पद्धतीने सुरू झाली आहे.

'Lotus' will continue doing an arti for Bappa! | ‘कमळ’ वाहिले बाप्पाला आरती करतच राहणार!

‘कमळ’ वाहिले बाप्पाला आरती करतच राहणार!

Next
पुणो : ‘गणपतीला कमळ वाहिले’, ‘आम्ही आरतीच करत राहणार’ अशा सांकेतिक भाषेतून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकत्र्यामधील हालचालींचा मागोवा  घेतला जात असून, भाजपामधील कोणत्या नेत्याला कोण भेटले, याची कुजबूज वेगळ्या पद्धतीने सुरू झाली आहे.
 खडकवासला मतदारसंघातील 26 जण विधानसभेसाठी इच्छुक असून, त्यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची, याचा पेच पक्षापुढे आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला आला आहे. पक्ष बळ असूनही गेल्या 5 वर्षामध्ये या पक्षाला या भागात यश मिळू शकलेले नाही. राष्ट्रवादीला सोडल्या गेलेल्या 144 जागांवरून काँग्रेसचे जे इच्छुक लढू इच्छितात, त्यांच्या मुलाखती नुकत्याच मुंबईत झाल्या. त्या वेळी या मतदार संघात मित्रपक्षाला यश मिळत नसल्याने, तो काँग्रेससाठी सोडला जावा, अशी मागणी झाली. स्व:बळावर लढण्याची परवानगी देण्याचीही मागणी झाली.
 दरम्यान, काही इच्छुकांनी भाजपा नेत्यांशी उमेदवारीबाबत गुफ्तगू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या गुफ्तगूची वदंता या कार्यकत्र्यात असून, अमूकतमूक यांनी गणपतीला कमळ वाहिले, अशा सांकेतिक शब्दांत या भेटींची माहिती दिली जात आहे. ज्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही, असे इच्छुक आरती करत राहणार, असे सांगताहेत. (प्रतिनिधी)
 
चर्चा तर होणारच.!
भाजपाच्या स्थानिक नेतृत्वापेक्षा आपण प्रभावी असल्याने, आपले इलेक्टिव्ह मेरिट असल्याचा ‘त्यांचा’ दावा आहे. काँग्रेसचे प्रदेश पातळीवरचे पद असलेल्या, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे मतदारसंघातील सर्वात मोठे पद भूषविणा:या कार्यकत्र्याचा यात समावेश असल्याचे बोलले जाते. माजी आमदारांनी या वृत्ताचा साफ इन्कार केला. भाजपाचे नेतेच आपल्याला भेटले, असे त्यांचे म्हणणो आहे.   

 

Web Title: 'Lotus' will continue doing an arti for Bappa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.