प्रेयसीची कैचीने निर्घृण हत्या
By admin | Published: June 17, 2016 02:38 AM2016-06-17T02:38:57+5:302016-06-17T02:38:57+5:30
किरकोळ वादातून प्रियकरानेच प्रेयसीची कैचीच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. याप्रकरणी वी.बी नगर पोलिसांनी इरफान उर्फ समीर मोहम्मद उमर वारसी
मुंबई : किरकोळ वादातून प्रियकरानेच प्रेयसीची कैचीच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. याप्रकरणी वी.बी नगर पोलिसांनी इरफान उर्फ समीर मोहम्मद उमर वारसी (२५) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
कुर्ला परीसरात राखी किरण मंगवाना (२४) ही तरुणी कुटुंबियांसोबत राहायची. त्याच परीसरात लेदरच्या कारखान्यात काम करत असलेल्या इरफान सोबत तिचे प्रेम जडले. दोघांच्या प्रेमसंबंधामुळे इरफानची पत्नीने वर्षभरापूर्वी घर सोडले. मुलाला घेऊन ती माहेरी निघून गेली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पत्नी पुन्हा इरफानच्या संपर्कात आल्याने राखी आणि इरफानमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे इरफाने तिला कारखान्यात न येण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरी देखील बुधवारी दुपारी दिडच्या सुमारास राखी कारखान्यात आली. तिने पुन्हा इरफानसोबत भांडण सुरु केले. याच रागात त्याने कारखान्यातील मोठया कैचीने तिच्या मानेवर हल्ला चढविला. रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या राखीला पाहून तोही घाबरला.
त्याने तिला तत्काळ जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल
केले. उंचावरुन कैची मानेवर पडल्याने राखी जखमी झाल्याची माहिती त्याने तेथील डॉक्टरांना दिली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तेथील डॉक्टरांनी राखीला मृत घोषित केले.
मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या वी.बी नगर पोलिसांनी अधिक तपास सुरु केला. तपासामध्ये संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इरफानला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु असल्याची माहिती. वी.बी नगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)