प्रेमी युगुलास मारहाण करणारे अटकेत

By admin | Published: January 17, 2015 05:27 AM2015-01-17T05:27:27+5:302015-01-17T05:27:27+5:30

व्हॉट्स्अ‍ॅपवर युगुलाला मारहाण केल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ लातूरच्याच मुला-मुलीचा असल्याचे गुरुवारी रात्री उशिरा समोर आले.

Lovers lynch accused | प्रेमी युगुलास मारहाण करणारे अटकेत

प्रेमी युगुलास मारहाण करणारे अटकेत

Next

लातूर : व्हॉटस्अ‍ॅपवर युगुलाला मारहाण केल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ लातूरच्याच मुला-मुलीचा असल्याचे गुरुवारी रात्री उशिरा समोर आले. यानंतर रात्रभर स्पॉटपाहणी करणाऱ्या पोलिसांनी पहाटे ४ वाजता मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी ‘गनिमी कावा’ या संघटनेच्या सहा जणांवर मुरुड पोलिसांत गुन्हा नोंद केला. गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाने तातडीने कोम्बींग आॅपरेशन करून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमोल खंदाडे (१९), संदीप गोडसे (१९), नितीन गोडसे (२७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर म्होरक्या बालाजी गोडसे, राकेश गोडसे आणि अक्षय बनसोडे हे फरार आहेत.
लातुरातील एक युगूल ३० नोव्हेंबर २०१४ रोजी सायंकाळी विमानतळाजवळ साखरापाटीच्या रस्त्यावरून दुचाकीने जात होते. त्याचवेळी जवळील हॉटेलमध्ये बसलेल्या गनिमी कावाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा कारने पाठलाग केला. कारमधील सहा जणांनी रस्त्यावर या युगुलाला अडवून जबर मारहाण केली. याचे मोबाइलवर चित्रीकरण केले़
ही चित्रफीत एक महिन्यापासून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर व्हायरल झाली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनेही हा व्हिडीओ प्रसारित केला. गृहराज्यमंत्र्यांनी गुरुवारी या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले. यानंतर तपासचक्रे हलली आणि हा व्हिडीओ लातूरच्या युगुलाचा असल्याचा संशय आला. गुरुवारी रात्री पीडित तरुणाने पुढे येत पोलीस ठाणे गाठले.
लातूर शहर, मुरुड आणि गातेगाव या तीनही ठाण्यांच्या पोलिसांनी मध्यरात्री स्पॉट पाहणी करून हे प्रकरण मुरुड पोलिसांच्या हद्दीतील असल्याने पहाटे गुन्हा नोंद केला. (प्रतिनिधी)

Web Title: Lovers lynch accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.