कुटुंबातील विरोधामुळे प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By admin | Published: May 18, 2016 05:26 AM2016-05-18T05:26:01+5:302016-05-18T05:26:01+5:30

दोन बायकांचा दादला असणाऱ्या युवकाने मेव्हणीसोबतच्या प्रेमसंबंधाना घरचे विरोध करतात म्हणून प्रेयसीसह गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

Lover's suicide due to family opposition | कुटुंबातील विरोधामुळे प्रेमीयुगुलाची आत्महत्या

कुटुंबातील विरोधामुळे प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Next


सोलापूर : आधीच दोन बायकांचा दादला असणाऱ्या युवकाने मेव्हणीसोबतच्या प्रेमसंबंधाना घरचे विरोध करतात म्हणून प्रेयसीसह गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. येथील नईजिंदगी परिसरात मंगळवारी पहाटे ५ वाजता ही घटना घडली. रमेश यलप्पा शिपरी व दुर्गाव्वा दयामन्ना लळूडे (वय २५, सध्या दोघेही राहणार नईजिंदगी, सोलापूर, मूळ हुबळी-कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत़
कर्नाटकातून आलेला रमेश हा झाडूचा व्यवसाय करीत होता. त्याचे काही वर्षापूर्वी मयत दुर्गव्वा हिची लहान बहीण रेणुका हिच्याशी विवाह झालेला आहे. रमेश आणि रेणुका या दोघांना दोन मुली व एक मुलगा अशी तीन मुले आहेत.
त्यानंतर रमेशने घराशेजारी राहणाऱ्या राधा नावाच्या तरु णीशी दुसरा विवाह केला. राधाला रमेशपासून दोन मुले आहेत. मयत दुर्गव्वा ही हुबळी येथे वास्तव्यास होती. तिचा विवाह झालेला असून ती तीन मुलांची
आई आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश व दुर्गाव्वा या दोघांचे मागील तीन वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होते़ यलव्वा ही मुळची हुबळी शहरातील आनंद नगर भागात राहणारी आहे़ रमेश याच्यावर जिवापाड प्रेम असल्याने यलव्वा ही दर आठवड्याला दोन ते तीनदा खास रमेशला भेटायला येत होती़
रमेश व दुर्गव्वा यांचे प्रेमसंबंध हे रमेशच्या आधीच्या पत्नी रेणुका, राधा आणि दुर्गव्वाचा पती द्यामन्ना यांना माहीत होते. त्यांनी या प्रेमसंबंधांना विरोधदेखील केला होता. परंतु, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दुर्गव्वा व रमेश हे कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हते. यापूर्वी रमेश व दुर्गव्वा हे दोघे दोन वेळा घरातून पळूनदेखील गेले होते. परंतु, काही दिवसानंतर ते दोघेही स्वत: परत आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Lover's suicide due to family opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.