उजनीची पातळी खालावली; उणे २७ टक्के
By Admin | Published: March 17, 2016 12:48 AM2016-03-17T00:48:49+5:302016-03-17T00:48:49+5:30
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी मायनसच्या नीचांकी पातळीवर जाण्याच्या मार्गावर आहे़ उन्हाळा आणखी अडीच महिने
- सिद्धेश्वर शिंदे, बेंबळे
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी मायनसच्या नीचांकी पातळीवर जाण्याच्या मार्गावर आहे़ उन्हाळा आणखी अडीच महिने असताना उजनी धरण उणे २७ टक्क्यांवर पोहोचले आहे़
यंदा कमी झालेल्या पावसामुळे उजनीने कशीबशी मायनसमधून प्लसमध्ये वाटचाल केली, मात्र पुरेसा पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे उजनी धरण डिसेंबरमध्येच मायनसमध्ये गेले़ गतवर्षी १ मेपासून प्लसमधून मायनसमध्ये गेले होते़ ते जूनपर्यंत वजा २५ टक्के झाले होते़ यंदा मात्र १५ मार्चलाच वजा २५ टक्के झाले आहे़ त्यामुळे उजनीची वाटचाल बिकट अवस्थेकडे चालू आहे़