सिडकोच्या शिल्लक घरांना अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 02:29 AM2016-11-02T02:29:13+5:302016-11-02T02:29:13+5:30
विविध गृहप्रकल्पांत शिल्लक राहिलेल्या सिडकोच्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे.
नवी मुंबई : विविध गृहप्रकल्पांत शिल्लक राहिलेल्या सिडकोच्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. या घरांसाठी जवळपास १३ हजार अर्जांची विक्री झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ ४५0 अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. असे असे असले तरी अर्ज सादर करण्याच्या मुदतीपर्यंत हा आकडा वाढेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. एकूणच नव्या वर्षात सिडकोच्या येवू घातलेल्या नव्या गृहप्रकल्पामुळे ग्राहकांनी शिल्लक घरांकडे पाठ फिरविल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
विविध प्रकल्पांत विक्रीविना पडून असलेल्या ३८0 घरांच्या विक्रीसाठी सिडकोने अर्ज काढले होते. यात खारघर व उलवे येथील व्हॅलिशिल्प, वास्तुविहार,सेलिब्रेशन आणि उन्नती या गृहप्रकल्पातील घरांचा समावेश आहे. ३0 नोव्हेंबरपर्यंत अर्जांची विक्री केली जाणार आहे, तर १८ आॅक्टोबरपासून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची ही मुदत २ डिसेंबरपर्यंत आहे. असे असले तरी आतापर्यंत केवळ ४५0 अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. तर जवळपास १३ हजार अर्जांची विक्री झाली आहे. असे असले तरी अर्ज सादर करण्याची मुदत २ डिसेंबरपर्यंत असल्याने या कालावधीत आणखी अर्ज प्राप्त होतील, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. प्रत्यक्षात मात्र नवीन वर्षात सिडकोने जाहीर केलेल्या नव्या गृहप्रकल्पामुळे ग्राहकांकडून या शिल्लक घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी तळोजा येथे १३,८१0 घरांचा नवीन गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. साधारण जानेवारी २0१७ पासून या गृहप्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. या नव्या गृहप्रकल्पात विविध क्षेत्रफळांच्या बजेटमधील घरांचा समावेश आहे. वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या ग्राहकांसाठी येवू घातलेला नवीन गृहप्रकल्प पर्वणीचा वाटू लागला आहे. याचाच परिणाम म्हणून शिल्लक घरांच्या विक्रीचे अर्ज घेवून सुध्दा अनेकांनी अर्ज सादर करण्याबाबतचे आपले बेत बदलल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)
>आगामी काळात सर्वसामान्यांना बजेटमधील घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार २0१९ पर्यंत ५५ हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने बाळगले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील प्रत्येक वर्षी नवीन गृहप्रकल्प साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने ३८,३१७ घरांची निर्मिती करण्याची योजना आहे. त्याबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. ही घरे घणसोली, वाशी, पाचनंद आदी ठिकाणी बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले