कमी दाबाचे रूपांतर ‘कोमेन’ चक्रीवादळात!
By admin | Published: July 31, 2015 02:32 AM2015-07-31T02:32:19+5:302015-07-31T02:32:19+5:30
ईशान्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या बांगलादेशच्या भागावर असलेल्या खोल न्यून (कमी) दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून (डिप डिप्रेशन) त्याचे रूपांतर ‘कोमेन’ चक्रीवादळात झाले आहे.
मुंबई : ईशान्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या बांगलादेशच्या भागावर असलेल्या खोल न्यून (कमी) दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून (डिप डिप्रेशन) त्याचे रूपांतर ‘कोमेन’ चक्रीवादळात झाले आहे. परिणामी कोकणासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यात आलेला मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै, १, २ आणि ३ आॅगस्टदरम्यान कोकणासह गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. तर ३१ जुलै, १, २ आणि ३ आॅगस्टदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील पावसाचा जोर वाढेल. शिवाय राजस्थान आणि मध्य प्रदेशातील हवामान बदलांना वेग येईल आणि पावसाचे प्रमाण वाढेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)