विदर्भात पाच वर्षांतील सर्वांत कमी जलसाठा

By admin | Published: May 2, 2016 12:38 AM2016-05-02T00:38:19+5:302016-05-02T00:38:19+5:30

संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळ झाला असताना विदर्भातील प्रमुख प्रकल्पांमध्येही केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा

The lowest water storage in five years of Vidharbha | विदर्भात पाच वर्षांतील सर्वांत कमी जलसाठा

विदर्भात पाच वर्षांतील सर्वांत कमी जलसाठा

Next

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळ झाला असताना विदर्भातील प्रमुख प्रकल्पांमध्येही केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा जलसाठा सर्वांत कमी आहे.
जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार विदर्भात प्रामुख्याने तोतलाडोह, कामठी खैरी, खिंडसी, वडगाव, इटियाडोह, सिरपूर, पुजारी टोला, कालिसरार, असोलामेंढा, दिना, बोर, धाम, पोथरा, लोअर वर्धा, गोसेखुर्द, बावनथडी, इरई व संजय सरोवर असे एकूण १९ मोठे जलप्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची क्षमता ३ हजार २५७ दलघमी असून, सध्या त्यात ८८७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता २०११ मध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटी १ हजार ३१५ दलघमी एवढा जलसाठा होता. तसेच २०१२ मध्ये ९४०, २०१३ मध्ये १ हजार २० व २०१४ मध्ये १ हजार ६७४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता. या आकडेवारीवरू न यंदाचा पाणीसाठा सर्वांत कमी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या जलसाठ्यावर उन्हाळ्याचा आणखी एक महिना काढण्याचे आव्हान विदर्भापुढे आहे.

मध्यम तलावांत
१७ टक्के पाणी
संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रकल्पांसोबतच एकूण २३ मध्यम प्रकल्प असून, त्यात २८ एप्रिलपर्यंत १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या मध्यम प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने चंद्रभागा, मोरधाम, केसरनाला, उमरी, कोलार, खेकरानाला, वेणा, कान्होलीबारा, पांढराबोडी, मकरधोकडा,सायकी, जाम, कार, चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरना, बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, मानागड व रेंगेपार या प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी १३ प्रकल्प नागपूर जिल्ह्यात असून, चार भंडारा जिल्ह्यात, तर सहा गोंदिया जिल्ह्यात आहेत.

Web Title: The lowest water storage in five years of Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.