राजपत्रित अधिका-यांचीएलपीजी सबसिडी काढणार!
By Admin | Published: August 26, 2015 11:53 PM2015-08-26T23:53:41+5:302015-08-26T23:57:47+5:30
पेट्रोलियम मंत्रालयाचे आदेश.
सिद्धार्थ आराख/ बुलडाणा : राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांसह वर्ग १च्या अधिकार्यांनी गॅस सिलिंडरची (एलपीजी) सबसिडी सोडून द्यावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व जिल्हाधिकार्यांना याबाबत पत्र दिले असून, त्यानुसार कार्यवाही देखील सुरू झाली आहे. वर्षभरापासून गॅस सिलिंडरची सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे. शक्य असेल त्यांनी गॅसची सबसीडी सोडून द्यावी, असे आवाहन शासनाने केले आहे. त्याच अनुषंगाने शासनाने प्रशासनातील अधिकार्यांवर यासाठी सक्ती केली आहे. त्याची सुरूवात राजपत्रित अधिकार्यांपासून करण्यात आली आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्य मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सहीने ७ ऑगस्ट रोजी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना प्राप्त झाले असून आपल्या अधिनस्त असलेल्या वर्ग एकच्या अधिकार्यांना गॅसची सबसिडी सोडून देण्याच्या सूचना द्याव्या, या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, असे या त्यात नमूद करण्यात आले आहे.