लुपिन कंपनीचे संस्थापक देशबंधु गुप्ता यांचे निधन

By admin | Published: June 28, 2017 01:49 AM2017-06-28T01:49:42+5:302017-06-28T01:49:42+5:30

लुपिन लिमिटेड या आघाडीच्या भारतीय औषध कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष देशबंधू गुप्ता (७९) यांचे सोमवारी सकाळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले

Lubkin company founder Deshbandhu Gupta passes away | लुपिन कंपनीचे संस्थापक देशबंधु गुप्ता यांचे निधन

लुपिन कंपनीचे संस्थापक देशबंधु गुप्ता यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लुपिन लिमिटेड या आघाडीच्या भारतीय औषध कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष देशबंधू गुप्ता (७९) यांचे सोमवारी सकाळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
१९६८ साली देशबंधू गुप्ता यांनी लुपिन या औषधनिर्माण कंपनीची स्थापना केली. अल्पावधीतच जगभरातील शंभरहून अधिक देशांत लुपिन कंपनीने व्यवसायाचा विस्तार केला. लुुपिन गेल्या वर्षी भारतात दुसऱ्या क्रमांकाची औषधनिर्माण कंपनी ठरली.
राजस्थानमधील राजगड येथे ८ फेब्रुवारी १९३८ मध्ये जन्मलेल्या गुप्ता यांनी रसायनशास्त्र विषयातून एम. एस्सी. केले होते. कमी किमतीत अधिक गुणवत्ता असलेल्या औषधनिर्मितीवर गुप्ता यांचा भर असे. भारतीय औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी बनण्यासह लुपिन ही बाजार भांडवलामध्ये जगातील चौथी मोठी कंपनी ठरली आहे.

Web Title: Lubkin company founder Deshbandhu Gupta passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.