जिजाऊच्या लेकीला सुवर्णपदकाचा बहूमान

By admin | Published: September 22, 2016 05:02 PM2016-09-22T17:02:40+5:302016-09-24T03:35:48+5:30

मातृतीर्थ मतदारसंघातील देऊळगावमही येथील अत्यंत गरीब निठवे कुटुंबातील हर्षदाने आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळून दिले.

The Lucky Gold Medal of Jijau | जिजाऊच्या लेकीला सुवर्णपदकाचा बहूमान

जिजाऊच्या लेकीला सुवर्णपदकाचा बहूमान

Next

अशरफ पटेल
देऊळगावराजा, दि. २२ : मातृतीर्थ मतदारसंघातील देऊळगावमही येथील अत्यंत गरीब निठवे कुटुंबातील हर्षदाने आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळून दिले. हर्षदा निठवेने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात यशस्विनी देवसाल आणि मलायका गोएलसोबत सर्वणपदकाची कमाई केली. मॉ जिजाऊच्या लेकीला सुवर्ण पदाचा बहुमान मिळाल्यामुळे जिजाऊच्या नगरीचे नाव संपूर्ण भारतात झाल्यामुळे सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत
आहे.

देउळगाव मही येथील रहिवासी असलेले संदानंद अप्पा व त्यांची पत्नी श्रद्धा निठवे यांनी ११ वर्षांपुर्वी उहरनिर्वाह आणि मुला मुलीच्या शिक्षाणासाठी, औरंगाबाद गाठले व मेस सुरू केली. शिक्षणासाठी आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना अगदी अल्पशा दरात जेवनाचे डब्बे उपलब्ध करुन दिले. सध्या ते खानावळीचा व्यवसाय करीत आहेत. या छोट्याशा मिळकतीतून ते संसाराचा गाढा ओढतात. त्यांनी हर्षदाला क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्यास प्रोत्साहीत केले. हर्षदा निठवे हिने जिद्दीच्या बळावर आजपर्यंत शुटींग
पिस्तूलमध्ये ५५ पदक प्राप्त केले आहे. तिने तेजस्वनी मुळे, गंगा नारंग, अभिनव बिंद्रा, तेजस्वनी निसावंत, अंजली भागवत यांच्याकडून प्रेरणा घेवून पिस्टुलमध्ये भारतात युवा संघामध्ये प्रथम क्रमांकावर स्थान मिळविले आहे.

तसेच महिला गटात १२ वे स्थान प्राप्त केले आहे. हर्षदा ७ व्या वर्गापासून शुटिंग एअर पिस्टुलची ट्रेनिग संग्राम देशमुख यांच्याकडून घेत आहे. ८ वी आशीया स्पर्धा नवी दिल्ली येथे झालेल्या शुटींग स्पर्धेत भारताला कांस्य पदक आणि सांघिक गटात सुवर्ण पदक तसेच कुवेत येथे १३ वी सांघिक खेळात तीन सुवर्ण पदक मिळवित ६ क्रमांक पटकाविला. अझरबैजान येथे हर्षदाने सांघिक गटाच्या अंतिम फेरीत ११२२ गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकाचा बहूमान प्राप्त केला. या स्पर्धेत हर्षदा महाराष्ट्र युवा संघाचा नेतृत्व करीत आहे. तसेच संग्राम देशमुख यांच्या मागदर्शनाखाली औरंगाबाद  येथील एमजीएममध्ये अद्यावत शुटींग रेंजचा सराव करीत आहे. तसेच एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी हर्षदा यांच्या सरावासाठी निशुल्क व्यवस्था करुन
दिली.

संदानंद अप्पा यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि शुटींगमध्ये उज्वल भविष्य घडविण्याकरिता अत्यंत गरीब परिस्थितीतही तिला लागणारे साहित्य पुरविले.

Web Title: The Lucky Gold Medal of Jijau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.