शुक्रवारी छायाकल्प चंद्रग्रहण!
By admin | Published: February 9, 2017 05:28 AM2017-02-09T05:28:57+5:302017-02-09T05:28:57+5:30
शुक्रवार अर्थात माघ पौर्णिमेच्या रात्री छायाकल्प चंद्रग्रहण होणार असून ते ग्रहण चंद्रास्त होईपर्यंत भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.
ठाणे : शुक्रवार अर्थात माघ पौर्णिमेच्या रात्री छायाकल्प चंद्रग्रहण होणार असून ते ग्रहण चंद्रास्त होईपर्यंत भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.
चंद्र ज्या वेळी पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेत येतो, त्या वेळी जे ग्रहण होते, त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी झालेले दिसते. इतर ग्रहणांपेक्षा थोडा वेगळा म्हणजे साध्या डोळ्यांनी हा आविष्कार पाहता येतो.
हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतासह पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप, ग्रीनलंड आणि अमेरिका येथून दिसणार आहे. या छायाकल्प चंद्रग्रहणात कोणतेही ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळावयाचे नसतात. याच महिन्यात म्हणजे माघ अमावस्येच्या दिवशी २६ फेब्रुवारीला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. मात्र, ते भारतातून दिसणार नसल्याची माहितीही सोमण यांनी दिली. (प्रतिनिधी)