नोकरीच्या आमिषाने 10 जणींना फसविले
By admin | Published: July 23, 2014 02:39 AM2014-07-23T02:39:09+5:302014-07-23T02:39:09+5:30
म्हसावद येथील 10 महिलांची 1 लाख 2क् हजार रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
Next
जळगाव : कोपरगाव येथील आनंद जैन सेवा मंच संचलित राजीव गांधी पाळणाघर योजनेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवित म्हसावद येथील 10 महिलांची 1 लाख 2क् हजार रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील रहिवासी सीताराम शालीक पाटील यांनी म्हसावद येथील दुर्गाबाई आनंदा हुजरे यांच्यासह 1क् महिलांना आनंद जैन सेवा मंच, कोपरगाव संचलित राजीव गांधी पाळणा घर योजनेंतर्गत बाल सेविका म्हणून नियुक्ती देण्याचे आमिष दाखविले.
आरोपीने या सर्व महिलांना पाळणा घर योजनेचे काम दाखविण्यासाठी कोपरगाव येथे नेले. त्या वेळी त्याने सर्व महिलांकडून प्रत्येकी 3 हजार रुपये घेतले. त्यानंतर एका साध्या कागदावर या महिलांना नियुक्तीपत्र देण्यास सुरुवात केली. पाटील याने नियुक्तीपत्र दिल्यानंतर 26 मे 2क्12 रोजी म्हसावद येथे सर्व महिलांकडून प्रत्येकी 9 हजार रुपये घेतले. पाटील याने या महिलांना 2 हजार रुपये पगार देण्याचे आश्वासन दिले.
शून्य ते पाच वयोगटातील लहान मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी या महिलांवर सोपविण्यात आली. सकाळी 1क् ते सायंकाळी 5 या वेळेत घरातल्या घरात पाळणाघर चालविण्याची सूचना दिली.
या महिलांनी काही दिवस काम केले. मात्र पगाराची रक्कम मिळत नसल्याने त्यांनी पाटीलकडे 12 हजार रुपयांच्या रकमेसाठी तगादा लावला. पैसेही मिळत नाही
आणि नोकरीदेखील मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले. (प्रतिनिधी)