‘लक्झरी’ शिवशाही होणार ‘सेमी-लक्झरी’, प्रवासी मिळवण्यासाठी लढवली शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 05:28 AM2018-03-07T05:28:13+5:302018-03-07T05:28:13+5:30

परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली शिवशाही एसटीच्या ताμयात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. मात्र आरामदायी आणि वातानुकूलित असलेल्या एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

'Luxury' Shivshahi will be held for 'Semi-luxury', the journey of the passengers | ‘लक्झरी’ शिवशाही होणार ‘सेमी-लक्झरी’, प्रवासी मिळवण्यासाठी लढवली शक्कल

‘लक्झरी’ शिवशाही होणार ‘सेमी-लक्झरी’, प्रवासी मिळवण्यासाठी लढवली शक्कल

googlenewsNext

- महेश चेमटे  
मुंबई  -  परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली शिवशाही एसटीच्या ताμयात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. मात्र आरामदायी आणि वातानुकूलित असलेल्या एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. परिणामी प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी महामंडळाने नवी शक्कल लढवली आहे. त्यानुसार वातानुकूलित असलेली शिवशाही सेमी-लक्झरीप्रमाणे चालविण्याचे
आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व विभागांना ‘महत्त्वाचे’ या मथळ्याखाली परिपत्रकातून तसे आदेशच देण्यात आले आहेत.
एसटी महामंडळात मार्च अखेर तब्बल दोन हजार शिवशाही एसटी दाखल होणार आहेत. यापैकी १ हजार ५०० बस या भाडेतत्त्वावर असून ५०० बस महामंडळाच्या मालकीच्या असतील. सद्य:स्थितीत राज्यभरातील ११५ मार्गांपेक्षा जास्त मार्गांवर शिवशाही धावत आहेत.
एसटी ताμयात सध्या ३००पेक्षा जास्त स्वमालकीच्या आणि १५०पेक्षा जास्त बस भाडेतत्त्वावरील शिवशाही धावत आहेत. मात्र बहुतांशी मार्गांवर शिवशाहीसाठी प्रवासीसंख्या रोडावल्याचे वरिष्ठ अधिकाºयांचे म्हणणे आहे. वाजतगाजत शिवशाही एसटीच्या ताμयात दाखल झाली असली तरी मर्यादित थांबे असल्यामुळे शिवशाहीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. परिणामी प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आता निम आराम सेवेप्रमाणे ही सेवा चालविण्याचे आदेश महामंडळाने राज्यातील सर्व विभागांना दिले आहेत. २१ मार्चपासून राज्यातील सर्व शिवशाही बस या निम-आराम सेवेप्रमाणे सुधारित वेळेनुसार चालविण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. तसेच संबंधित चालक आणि वाहकांनादेखील ड्युटी देण्यात यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.

...अधिक खर्च होण्याची भीती
♦सध्या मर्यादित थांबे असूनदेखील शिवशाही बसबाबत उत्पन्न कमी
आणि खर्च अधिक असल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उजेडात
आले आहे. २०१७च्या सहा महिन्यांतच वातानुकूलित बसच्या इंधनावर
१० कोटी ४९ लाख ६ हजार २१५ रुपये खर्च करण्यात आला आहे.
♦तर खासगी बसला करारापोटी ६ कोटी २४ लाख ७७ हजार रुपये
देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सहा महिन्यांतील बसचे उत्पन्न
केवळ १४ कोटी ६९ लाख २५ हजार रुपये आहे. त्यामुळे लक्झरी
प्रकारातील शिवशाही सेमी-लक्झरीप्रमाणे चालविल्यास साहजिकच
इंधनावर आणि देखभालीवर अधिक खर्च होईल, अशी भीती एसटी
महामंडळातील वरिष्ठ अधिकारी खासगीत व्यक्त करत आहेत.

Web Title: 'Luxury' Shivshahi will be held for 'Semi-luxury', the journey of the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.