एम वेस्ट वॉर्ड : सत्ताधा-यांना संधी

By Admin | Published: December 29, 2016 12:40 PM2016-12-29T12:40:31+5:302016-12-29T14:51:28+5:30

मुलभूत नागरी समस्यांसाठी झगडणारा वॉर्ड म्हणजे एम वेस्ट वॉर्ड. पिण्याचे पाणी, नाल्यांची समस्या, शौचालयांची दुरावस्था आणि प्रदुषणाचा विळख्यातून हा वॉर्ड बाहेर पडू शकला नाही

M West Ward: The power of the powerhouse | एम वेस्ट वॉर्ड : सत्ताधा-यांना संधी

एम वेस्ट वॉर्ड : सत्ताधा-यांना संधी

googlenewsNext
>मनसे आणि राष्ट्रवादीला पक्षांतराचा फटका
- गौरीशंकर घाळे 
मुंबई : मुलभूत नागरी समस्यांसाठी झगडणारा वॉर्ड म्हणजे एम वेस्ट वॉर्ड. पिण्याचे पाणी, नाल्यांची समस्या, शौचालयांची दुरावस्था आणि प्रदुषणाचा विळख्यातून हा वॉर्ड बाहेर पडू शकला नाही. विशेष, म्हणजे राजकारणातील बड्या नेत्यांची वस्ती आणि त्यांच्या छत्रछायेत पोसली जाणारी राजकीय फळी यामुळे राजकीय हालचाली, घडामोडी मात्र नित्याची बाब आहे. 
मागील पालिका निवडणुकीत एकूण ८ प्रभागांपैकी चार जागांवर काँग्रेस आणि प्रत्येकी दोन जागांवर शिवसेना आणि भाजपाने कब्जा केला होता. मात्र, मधल्या काळात पोटनिवडणुकीत एक अतिरिक्त जागा शिवसेनेकडे आली. काँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरींना कंटाळून अनिल पाटणकर यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला होता. पुढे शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी पोटनिवडणुकीत ही जागा स्वत:कडे कायम राखली. इच्छुकांच्या आयाराम-गयाराम पद्धतीच्या राजकारणाचा शिवसेना आणि भाजपाला मोठा फायदा होणार आहे. काँग्रेसनेही काही भिडू आपल्या तंबूत आणण्यात यश मिळविले आहे. गेल्यावेळी शिवसेनेला दोन जागांवर आस्मान दाखविण्या-या आणि पाच जागांवर तिस-या क्रमांकाची मते घेणा-या मनसेची मात्र पुरती दैना उडाली आहे. आधीच पक्षाची अवस्था सध्या नाजूक बनली आहे त्यातच ज्यांचे थोडेफार काम आहे त्यांनी बाहेरचा रस्ता धरला आहे. 
राष्ट्रवादीलाही पक्षांतराचा मोठा फटका बसला आहे. आशा मराठे यांनी अलीकडेच भाजपाचा रस्ता धरला तर लहू कांबळे यांनी शिवसेना जवळ केली. आशा मराठे यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीची या भागातील आशाच संपुष्टात आली आहे. मुंबईतील राष्ट्रवादीचा आकार मुळातच लहान. आशा मराठे यांच्या रुपाने पक्षाने या भागात नेतृत्व निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा विस्तारही होत होता. पालिका निवडणुकीत काही पदरात पडेल अशी आशा निर्माण झालेली असतानाच पक्षांतर झाल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. मनसे आणि राष्ट्रवादीच्या या पीक्षेहाटीचा थेट फायदा सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे अनेक मुख्य लढतही याच तीन पक्षांमध्ये असणार आहे. शिवाय दलित मतदारांची मोठी संख्या या भागात असल्याने रिपब्लिकन मते कशी फिरणार आणि महायुतीत काय काय राजकारण रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
बिनकामी मोनो
वाहतुक कोंडीवरील समस्येचा उतारा म्हणून मोनो आणि मेट्रो मुंबईत आली. त्यातील मोनोचा पहिला टप्पा या वॉर्डात असून त्याचा कोणताच लाभ होत नाही. आधीच अरुंद रस्ते आणि त्याच बिनकामी मोनोची अडचण अशी परिस्थिती येथे झाली आहे. वाशी नाका, चेंबूर नाका आणि स्टेशन परिसर कायम या कोंडीने ग्रासलेले असतात. 
पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष 
या वॉर्डातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रोजच संघर्ष करावा लागतो. पालिकेने पाण्याबाबत कितीही गप्पा मारल्या तरी एक -दोन तासापेक्षा अधिक काळ येथे पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पाणी माफियांचाही मोठा सुळसुळाट या भागात आहे. 
दुर्गंधी आणि प्रदुषण 
आरसीएफ, टाटा थर्मल, चप्पल व्यावसायिक आणि डम्पिग ग्राऊंडमुळे स्थानिक हैैराण झाले आहेत. प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत असल्याने स्थानिकांना श्वसनाचे आणि घशाच्या विकारांना सामारे जावे लागत आहे. प्रदुषणाविरोधात स्थानिकांनी अनेक तक्रारी दाखल करुनही यंत्रणा ढिम्मच आहेत. 
टिळक नगर, इंदिरानगर झोपडपट्टी, छेडानगर, पेस्तमनगर कॉलनी, राहूलनगर, बीएमसी कॉलनी, ज्योतीनगर, न्यू गरीब जनतानगर.पोस्टल कॉलनी, चेंबूर गावठाण, जयअंबेनगर, महादेववाडी, संतोषनगर, वसंतनगर, संभाजीनगर, चेंबूर कॉलनी, युनियन पार्क, कलेक्टर कॉलनी, अशोकनगर, म्हैसूर कॉलनी, माहूल व्हिलेज, सुमननगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी, भक्तीपार्क आदी भागाचा या वॉर्डात समावेश होतो. 
नवीन रचना
१४९ खुला
१५० खुला
१५१ खुला
१५२ अनुसूचित जाती
१५३ इतर मागासवर्ग
१५४ खुला
१५५ अनुसूचित जाती
 
प्रभाग क्रमांक १४९
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ४९९८३
अनुसूचित जाती - ४७५०
अनुसूचित जमाती - ६७३
प्रभागाची व्याप्ती - टिळक नगर, इंदिरानगर झोपडपट्टी, छेडानगर, पेस्तमनगर कॉलनी.सहकार नगर, ठक्करबाप्पा कॉलनी, वत्सलबाई नाईकनगर, साईबाबा नगर.
 
प्रभाग क्रमांक १५०
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५०३९१
अनुसूचित जाती - ७६१६
अनुसूचित जमाती - ३३५
प्रभागाची व्याप्ती - राहूलनगर, बीएमसी कॉलनी, ज्योतीनगर, न्यू गरीब जनतानगर.
 
प्रभाग क्रमांक १५१
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५९१६९
अनुसूचित जाती - २६४५३
अनुसूचित जमाती - २९६
प्रभागाची व्याप्ती - सहकार नगर, ठक्करबाप्पा कॉलनी, वत्सलबाई नाईकनगर, साईबाबा नगर.
 
प्रभाग क्रमांक १५२ 
आरक्षण - अनुसूचित जाती
एकूण लोकसंख्या - ६०३६३
अनुसूचित जाती - ११८५९
अनुसूचित जमाती - ७८५
प्रभागाची व्याप्ती - पोस्टल कॉलनी, चेंबूर गावठाण, जयअंबेनगर, महादेववाडी.
 
प्रभाग क्रमांक १५३
आरक्षण - इतर मागासवर्ग
एकूण लोकसंख्या - ६०९८१
अनुसूचित जाती - ५१०९
अनुसूचित जमाती - ४२८
प्रभागाची व्याप्ती - संतोषनगर, वसंतनगर, संभाजीनगर.
 
प्रभाग क्रमांक १५४
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ६२६५३
अनुसूचित जाती - ५८५६
अनुसूचित जमाती - ५३१
प्रभागाची व्याप्ती - चेंबूर कॉलनी, युनियन पार्क, कलेक्टर कॉलनी, अशोकनगर.
 
प्रभाग क्रमांक १५५
आरक्षण - अनुसूचित जाती
एकूण लोकसंख्या - ६१५३०
अनुसूचित जाती - ११५५१
अनुसूचित जमाती - ८४१
प्रभागाची व्याप्ती - म्हैसूर कॉलनी, माहूल व्हिलेज, सुमननगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी, भक्तीपार्क. 
२०१२ च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार
वॉर्डविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते
१४२सीमा मेहूलकर, काँग्रेस७६१४सईदा हमीदानी, शिवसेना ६९९२
१४३शंकर शिवगण, भाजपा २९०५महेंद्र नाकते, अपक्ष २३९४
१४४राजश्री पालंडे, भाजपा ६२२२स्वराली शास्त्री, मनसे ४५२६
१४५वंदना साबले, काँग्रेस ६९४३सरस्वती फुलवारीया, अपक्ष ३७७७
१४६सुप्रदा पातरफेकर, शिवसेना८६९४नीलम डोळस, काँग्रेस ४१४६
१४७अनिल पाटणकर, काँग्रेस१०२७९तुकाराम काते, शिवसेना ९९९२
१४८संगिता हंडोरे, काँग्रेस ७९८३स्रेहा भालेराव, आरपीआय ३६६४
१४९दीपा परब, शिवसेना ५५०४अंजली सातर्डेकर, राष्ट्रवादी५०६८

Web Title: M West Ward: The power of the powerhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.