माजी आमदारांना जमीन देण्याच्या प्रस्तावावर निर्णय नाही

By अतुल कुलकर्णी | Published: July 30, 2017 01:12 AM2017-07-30T01:12:20+5:302017-07-30T01:14:05+5:30

maajai-amadaaraannaa-jamaina-daenayaacayaa-parasataavaavara-nairanaya-naahai | माजी आमदारांना जमीन देण्याच्या प्रस्तावावर निर्णय नाही

माजी आमदारांना जमीन देण्याच्या प्रस्तावावर निर्णय नाही

Next

मुंबई : नागपूरच्या म्हाडा सिटी, एम्प्रेस मिल क्र. ५ च्या जमिनीवर मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटाच्या लोकांसाठी म्हाडाने परवडणारी घरे बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिलेली असताना गृहनिर्माण विभागाने तो प्रस्ताव रद्द करत ही जागा विदर्भातील माजी आमदारांच्या सोसायटीला द्यावी, अशी मागणी आहे. अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सुभाष रोड नागपूर येथील एम्प्रेस मील क्र. ५ च्या जमिनपैकी तब्बल ७ एकर जमीन मिळावी म्हणून माजी आमदार राम संभाजी गुंडीले आणि सुधाकर गणगणे यांनी पाठपुरावा सुरु केला होता. मुळात गुंडीले हे उस्मानाबाद जिल्ह्यातील हेर मतदार संघाचे आमदार होते. पुढे डीलिमिटेशनमध्ये तो मतदार संघ गेला. मराठवाड्यातल्या माजी आमदारांना विदर्भात घर कशासाठी हवे, असा प्रश्न आता म्हाडाचे अधिकारी उपस्थित करत आहेत. तर गणगणे हे आकोट (जि. अकोला) विधानसभा मतदारसंघाचे आमदार होेते. जे माजी आमदार आज नागपुरातील मध्यवर्ती जागा मागत आहेत त्यांना याआधी आमदार असताना मुख्यमंत्री कोट्यातून घरे मिळाली आहेत. अनेकांनी मुंबईत राजयोग या लोखंडवाला सोसायटीत घरे मिळवली. अनेकांनी तत्कालिनमुख्यमंत्र्यांना सांगून स्वत:साठी व स्वत:च्या नातेवाईकांच्या नावावरही घरे मिळवली.
त्यानंतरही पुन्हा माजी आमदार कोणत्या अधिकारात जागा मागत आहेत. एका ठिकाणी मागणी मान्य केल्यास प्रत्येक शहरात आमदार घरे मागतील ती सरकार देणार आहे का?, असे असेल तर उद्या आम्हीदेखील माजी सनदी अधिकारी या नात्याने संघटना करुन सरकारला घरांसाठी जागा मागू, असेही एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र या प्रकरणी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मागणी असली तरी ती मान्य केली जाईल असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हाती आलेल्या कागदपत्रानुसार माजी आमदारांची ही मागणी मान्य होणार नाही. हे या दोन्ही आमदारांना २०१३ ते २०१५ या काळात चार चार पत्रे पाठवून कळविण्यात आले होते.
शिवाय विधान मंडळास
व संसदीय कार्य विभागासही म्हाडा ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचेही कळवण्यात आले
होते. तरीही याप्रकरणी पिठासीन अधिकाºयांना पुढे करुन त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावून १३ एप्रिल २०१६
रोजी बैठक घेतली गेली.
बैठकीनंतर म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना याबाबतचा अहवाल पाठवा, असे सांगण्यात आले. त्यांनी अहवाल पाठवला नव्हता तर पुन्हा १४ डिसेंबर २०१६ नागपूरला अधिवेशनाच्या वेळी आढावा बैठक घेतली गेली.

एम्प्रेस मिलसाठीच माजी आमदारांचा आग्रह
या माजी आमदारांना मौजा वडधामना येथील स.क्र. १९७, ११९ येथील जमीन दाखवण्यात आली. मात्र ती जमीन झिरो माईलपासून १३ ते १४ किलोमीटर दूर अमरावती रोडवर असल्याने ती जमीन सदस्यांना पसंत पडली नाही. त्यानंतर सदस्यांनी म्हाडाच्या ताब्यात असलेल्या एम्प्रेस मिल येथील जमिनीची पाहणी केली व त्यातील ७ एकर जमिनीसाठी हे माजी आमदार मागणी करु लागले.

Web Title: maajai-amadaaraannaa-jamaina-daenayaacayaa-parasataavaavara-nairanaya-naahai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.