माझा आणि लोकमतची #MaazaModak स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:00 AM2020-08-19T08:00:00+5:302020-08-19T09:20:23+5:30

गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी लोकमत आणि माझाची खास स्पर्धा

Maaza and Lokmat organise Maaza Modak Campaign for ganesh festival | माझा आणि लोकमतची #MaazaModak स्पर्धा

माझा आणि लोकमतची #MaazaModak स्पर्धा

googlenewsNext

विविधतेत एकता जपणारा भारत हा सणांचा देश आहे. त्यात गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. दरवर्षी भाद्रपद  चतुर्थी ते चतुर्दशी या काळात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.

सध्याचं कोरोना संकट पाहता सार्वजनिकपणे उत्सव साजरा करणं शक्य नाही. आपल्याला जवळच्या व्यक्तींसोबत अधिक वेळ व्यतित करता येतोय, ही लॉकडाऊनची सकारात्मक बाजू आहे. तसाच, यंदाचा गणेशोत्सवही आपल्याला घरी आपल्या माणसांसोबत साजरा करता येणार आहे.

गणेशोत्सवाचा अद्वितीय आनंद देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. या स्पर्धेत आम्ही प्रेक्षक आणि स्पर्धकांना 'माझा'चा वापर करून तयार केलेल्या पदार्थांची पाककृती पाठवण्यासाठी प्रोत्साहित करतो.

आपल्या सगळ्यांनाच आंबे आवडतात आणि मोदक हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी 'माझा मोदक' स्पर्धा परत आली आहे. गणेशोत्सव आणि 'माझा' यांच्यामध्ये एक समान धागा आहे. गणेशोत्सव महाराष्ट्राचा सण आहे आणि 'माझा' महाराष्ट्रामधल्या रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केला जातो. या समान धाग्यामुळे 'माझा' गणेशोत्सवासाठी सर्वोत्तम साथीदार ठरतो आणि उत्सवाचा आनंद द्विगुणीत करतो. मोदकांमध्ये रत्नागिरी हापूस आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या 'माझा'चा वापर करून तो आणखी स्वादिष्ट करणाऱ्या पाककृती लोकप्रिय सेलिब्रिटी शेफ 'माझा मोदक' स्पर्धेच्या माध्यमातून शेअर करतील. 

तुमच्या 'माझा मोदक' पाककृती शेअर करण्यासाठी माझा तुम्हाला आमंत्रित करतंय. https://www.lokmat.com/maazamodak वर तुमच्या पाककृती ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा. तुम्ही माझा मोदक स्पर्धेत सहभागी होऊन अ‍ॅपल आयफोन ७ आणि अ‍ॅमेझॉन इको डॉट जिंकू शकता. 

Lokmat.com वर मायक्रो साईट तयार करण्यात आली असून त्या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिडीओ, लाईव्ह कार्यक्रम, पाककृती आणि #MaazaModak स्पर्धेची माहिती मिळेल. तुम्ही या लिंकवर क्लिक करून #MaazaModak स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
माझा तुम्हाला दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून एक वेगळा अनुभव देण्यास मदत करतो. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स, रिफ्रेश होता.

ऑफिस, घर, मुलं यांच्यामुळे आपला संपूर्ण दिवस अतिशय बिझी असतो. विशेषत: आपल्या घरातील महिलांचा पूर्ण दिवस कुटुंबीयांची काळजी घेण्यात जातो. या अत्यंत भरगच्च वेळापत्रकातून महिलांना मिळणारे मोजके क्षण त्यांना पूर्णपणे निवांत आणि रिलॅक्स करणारे असावेत, असं 'माझा'ला वाटतं. 'माझा'च्या गोडव्यामुळे लहानसहान क्षणदेखील जिवंत होतात. 'माझा'चा रसाळपणा चेहऱ्यावर हसू फुलवतो. 'माझा'चा दाटपणा एक वेगळी अनुभूती देतो. 'माझा' रत्नागिरीतल्या हापूस आंब्यांपासून तयार केला जातो. भारतीयांच्या पसंतीत उतरलेला 'माझा' देशातला अव्वल नंबरी आंब्याचा रस आहे.

'माझा'च्या सोबतीनं 'लोकमत' #MaazaModak स्पर्धेची सुरुवात करत आहे. 'लोकमत' माध्यम समूहाच्या विविध व्यासपीठांवर अनेक प्रसिद्ध व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. ही संपूर्ण स्पर्धा डिजिटल असेल. त्यामुळे गणेशोत्सव सोहळ्याचा आनंद आणखी वाढेल आणि सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाचा प्रत्येक क्षणी अधिक आनंदी होईल!

रेसिपी करायला आतूर झाला आहात?... तुम्हीही बनवू शकता झक्कास माझा मोदक. www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझा खरेदी करा आणि आपल्या साहित्यासह सज्ज व्हा!

'MAAZAMODAK' हा कोड वापरा आणि १.२ लिटरच्या बॉटलवर/बाटलीवर मिळवा १०% सूट. आजच खरेदी करा!

Web Title: Maaza and Lokmat organise Maaza Modak Campaign for ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.