यंत्रणा कामाला लागल्या

By admin | Published: August 12, 2014 02:39 AM2014-08-12T02:39:34+5:302014-08-12T02:39:34+5:30

कुंभमेळ्यासाठी शासकीय यंत्रणांनी कंबर कसली असून, लाखो साधू आणि कोट्यवधी भाविकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विकासकामांना सुरुवात झाली आहे

The machinery is working | यंत्रणा कामाला लागल्या

यंत्रणा कामाला लागल्या

Next

संजय पाठक, नाशिक
कुंभमेळ्यासाठी शासकीय यंत्रणांनी कंबर कसली असून, लाखो साधू आणि कोट्यवधी भाविकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विकासकामांना सुरुवात झाली आहे. विविध शासकीय यंत्रणांनी तयार केलेल्या २,३७८ कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कामांना प्रारंभ झाला आहे.
२००३-०४मध्ये सुमारे सव्वापाचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. यंदा किमान साडेतीन लाख साधू-महंत आणि किमान सव्वा कोटी भाविक कुंभपर्वाला उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, नाशिकची लोकसंख्या १५ लाख इतकी असून, पर्वणीसाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार करता शहरात मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील.
पाणीपुरवठ्याची सुविधा आणि नैसर्गिक विधी आणि सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करणे मोठे आव्हान आहे.
राज्य शासनाने त्यासाठी विविध समित्या गठीत केल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती गठीत केली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असून, तिच्या दर पंधरा दिवसाआड बैठका सुरू आहेत. साधू-महंतांच्या काही व्यवहार्य सूचना अंमलात आणल्या जात आहेत.
गेल्या वर्षापासून राज्य शासनाने अंदाजपत्रकात तरतूद करून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधी देण्यास प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत नाशिक महापालिकेस सर्वाधिक २२३ तर त्रंबक नगरपालिकेस १६० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Web Title: The machinery is working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.