तांत्रिक देखाव्यात ‘मदनलाल धिंग्रा’ अग्रेसर

By Admin | Published: September 22, 2015 12:18 AM2015-09-22T00:18:33+5:302015-09-22T00:32:09+5:30

डायनासोर, स्केलटोरे, बोफोर्स तोफ, अ‍ॅनाकोंडा आणि यंदा ‘निंजा हातोडी’

'Madanlal Dhingra' leads in technical performance | तांत्रिक देखाव्यात ‘मदनलाल धिंग्रा’ अग्रेसर

तांत्रिक देखाव्यात ‘मदनलाल धिंग्रा’ अग्रेसर

googlenewsNext

कोल्हापूर : गणेशोत्सव म्हटले की, देखावे हे ओघाने आलेच म्हणून समजा. मात्र, ते देखावे नावीन्यपूर्ण आणि बालचमंूच्या मनी ठसणारे असले की, त्या गणेशोत्सव मंडळाची छबी कायम राहते. अशाच छबी गेली वीस वर्षे कोल्हापूरकरांच्या मनावर कोरणाऱ्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डायनासोर, स्केलेटोर, बोफोर्स तोफ, अ‍ॅनाकोंडा, डोरेमॉन यासारख्या हुबेहूब प्रतिकृती तयार करून त्या देखाव्यात सादर करण्याची परंपरा मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाने आजतागायत राखली आहे. १९९५ मध्ये ‘डायनासोर’ या चित्रपटाने संपूर्ण जगात खळबळ माजवून दिली होती. या चित्रपटातील हुबेहूब दिसणारा शाकाहारी डायनासोर (ट्रायसिरा ट्रॉप) मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाने साकारला. महाकाय वाटणारा १५ फुटांचा प्राणी तोही हालचाल आणि चालता करण्याचे मोठे आव्हानात्मक काम होते. हे आव्हानात्मक काम नुकतेच विज्ञान शाखेतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या मनू पोतदार व संतोष पोतदार या बंधूंनी स्वीकारले. त्यांनी रिमोट सेन्सरचा वापर करून पाच दिवस गणेशोत्सवात व विसर्जनादिवशी संपूर्ण मिरवणूक मार्गावर चालत फिरविला. या यशानंतर या मंडळाने गेल्या वीस वर्षांत कधी मागे फिरून पाहिले नाही. सातत्याने यात तांत्रिक देखाव्यांची भर पडत गेली तर पुढच्याच वर्षी अर्थात १९९६ मध्ये ‘स्केलेटोर’ हा देखावा सादर केला. त्यान्तर प्रतिवर्षी अ‍ॅनाकोडा, रोबोकॉप, बोफोर्स तोफ, वीरप्पन, लायन, जायंट स्पाईडर, फ्लॉर्इंग सोसर, जादू , हनुमान, टॉम अ‍ॅन्ड जेरी, अ‍ॅक्वॅरियम, जायंट बर्ड, जायंट एलिगेटर (अवतार फेम), क्युरॅसिटी रोव्हर,‘डोरोमान’, ’मोटू अ‍ॅन्ड पतलू’ या देखाव्यांच्या रूपातून प्रत्येकाला विचार करायला लावणारी प्रतिकृती सादर केली. केवळ मनोरंजन हा उद्देश या मंडळाने ठेवला नाही, तर यातून बालचमूने काहीतरी शिकावे हा होता. मुळात उद्यमनगर हे यंत्रनिर्मिती आणि यंत्रांची दुरुस्ती याकरिता संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. ज्या काळी स्कूटरची निर्मिती झाली नव्हती. त्याकाळी कोल्हापूरसारख्या अगदी लहान शहरातून म्हादबा मेस्त्री (शेळके) यांनी कोळशावर चालणारी स्कूटर व आचार्य अत्रे यांच्या विनंतीवरून फिरता रंगमंच त्याकाळात तयार केला होता. हीच परंपरा ही मंडळीही आजही जपत आहेत.
या मंडळाची धुरा संजय गायकवाड, फारूख शेख, सतीश भोसले, उदय भोसले, राजू शिंदे, अनिल पिसाळ, सुनील पिसाळ, समीर शेख, प्रमोद पाटील, धनंजय गायकवाड, धोंडिराम कवठेकर, विनोद पाटील, भगवान निकम, ओमकार भोसले, सिद्धेश भोसले, अफरोज शेख, आदी सांभाळत आहेत.


विज्ञान शाखेतून पदवी घेताना भौतिकशास्त्र हा विषय ठेवला होता. त्यातून इलेक्ट्रॉनिक्स विषयाची गोडी लागली. १९९२ मध्ये हाताची टाळी वाजविली की गाडी पुढे जाईल व टाळी वाजविली की गाडी थांबेल, असे मॅकॅझम असलेली गाडी बनविली होती. याबद्दल माझ्या मित्रांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी १९९५ मध्ये तू आपल्या मंडळासमोर ‘डायनोसार’ हा तांत्रिक देखावा तुम्ही दोघेजण करून द्या, अशी गळ घातली. त्यामुळे मी व माझा भाऊ संतोष व समीर, प्रमोद, सुनील, संदीप यांच्या साथीने ‘डायनोसार’सारखा महाकाय प्राणी रस्त्यावर फिरवून दाखविला. पुढे अ‍ॅनाकोंडा, बोफोर्स टँक, आदी देखावे सादर केले.
- मनु पोतदार, तंत्रज्ञ, मदनलाल धिंग्रा तरुण मंडळ

Web Title: 'Madanlal Dhingra' leads in technical performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.