चर्चेसाठी आमचे अजूनही दरवाजे खुले: माधव भंडारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 06:01 PM2019-11-02T18:01:17+5:302019-11-02T18:04:35+5:30
पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत असला तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही.भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात दोन्ही पक्षाकडून एकेमकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना अडली असून, भाजप मात्र यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे. या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र असे असले तरीही शिवसेनेसाठी भाजपचे अजूनही दरवाजे खुले असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा पाहिजे, म्हणून शिवसेना अडून बसली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र यावर बोलताना माधव भंडारी म्हणाले की, विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवल्या आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे भावी मुख्यमंत्री असतील असे त्यावेळीच स्पष्ट करून आम्ही या निवडणूक लढवल्या आहेत.
तर दोन्ही पक्षातील सुरु असलेल्या वादावर बोलताना भंडारी म्हणाले की, चर्चा आमच्याकडून थांबलेली नसून, चर्चेसाठी आमचे दार कायम उघडे असतील. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. तसेच हिंदुत्ववादाच्या विचारांच्या आधारावर आम्ही दोन्ही एकत्र आलो आणि याच विचारधाऱ्याच्या विचाराणे आम्ही पुढे एकत्र काम करू आणि पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही. त्यामुळे चर्चेचे दरवाजे अजूनही खुले असल्याचे भंडारी म्हणाले.