माधव भांडारींना पक्षाने महाराष्ट्राबाहेर निर्यात करावं - मनसे
By Admin | Published: June 1, 2017 01:14 PM2017-06-01T13:14:13+5:302017-06-01T13:17:10+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 1 - भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका केली ...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे.
मनसेचे अविनाश अभ्यंकर यांनीही माधव भांडारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाने त्यांना महाराष्ट्राबाहेर निर्यात करावं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
""कमालीचे कष्ट उपसूनदेखील पोटाची खळगी धड भरू न शकणाऱ्या शेतकरी बांधवांबद्दल विरोधात असताना आसवं गाळणारा आणि निवडणुकीच्या काळांत आश्वसनांच्या भूलथापा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने सत्ता हातात आल्यावर आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली"", असेही ते म्हणालेत.
""पक्षाचे राज्याचे अध्यक्ष शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्च शब्द वापरतात, शिवार संवादात मंत्री शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जातात. ही मुजोरी भाजपाच्या मंत्र्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत दिसून येते आणि "सगळ्यात मुजोर विधान कोणाचं" या स्पर्धेत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी उडी घेतली आहे"", अशी खोचक टीकाही अभ्यंकर यांनी भांडारींवर केली आहे.
""बिनधास्त संपावर जा आम्ही शेतमाल आयात करू"", असं विधान भांडारींनी केले. एकूणच भारतीय जनता पक्षाचा बौद्धिक क्षमतांचा आणि संवेदनशीलतेचा सातबारा कोरा आहे हे पुन्हा सिद्ध झाले असे सांगत अभ्यंकर यांनी शेतमाल आयात करण्यापेक्षा माधव भांडारींना पक्षाने महाराष्ट्राबाहेर निर्यात करावं हेच बरं, असा टोला हाणला आहे.
https://www.dailymotion.com/video/x8450i0