‘झलक’मध्ये माधुरीचा मॉडर्न लूक!
By admin | Published: June 5, 2014 12:04 AM2014-06-05T00:04:54+5:302014-06-05T00:04:54+5:30
लोकप्रिय ‘झलक दिखला जा’ ह्या डान्सप्रधान रिअॅलिटी शोच्या निर्मात्याने धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेनेशी गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत भेट घेतली.
Next
>पूजा सामंत - मुंबई
कलर्स वाहिनीवर येत्या सात जूनपासून आरंभ होणा:या लोकप्रिय ‘झलक दिखला जा’ ह्या डान्सप्रधान रिअॅलिटी शोच्या निर्मात्याने धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेनेशी गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत भेट घेतली. दर शनिवारी-रविवारी रात्री नऊ वाजता ‘झलक दिखला जा’ची सुरुवात होईल. गेल्या सीझनप्रमाणोच यंदा देखील माधुरी - करण जोहर आणि रेमो डिसुझा परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. माङया आजवरच्या बहुतेक चित्रपटांमधून मी भारतीय परिधानामधून दिसलेय. मग तो सिनेमा राजश्रीनिर्मित असो वा यशराजनिर्मित असो़ भारतीय वेषभूषा आणि मी या टीपिकल समीकरणाला ‘झलक’मध्ये मी आणि स्टायलिस्ट अनाहिता अडजानिया-श्रॉफ यांनी छेद दिलाय! मी आधुनिक वेषभूषेत असणार आह़े अनाहिताने माझा मेकओव्हरच
केलाय असं समजा़ पण मला आणि ‘झलक’ टीमला माङो हे नवे रंगरूप भावले आहे, ज्याने माझाही उत्साह दुणावलाय़, माधुरी अतिशय मूडमध्ये येऊन सांगू लागत़े अनाहिताने माधुरीवर अनेक ड्रेसेस आणि मेकअप, हेअर स्टाइल्स करून बघितल्या़ दोघींच्या मते ज्या उत्तम वाटल्या त्या निश्चित केल्यात़
‘झलक दिखला जा’मध्ये निवड झालेले स्पर्धक असतील पलक आणि कृती, करण आणि सुचित्र, गायक सुखविंदर आणि भावना, पुरब कोहली आणि मोहेना, सोफी चौधरी आणि दीपक, अक्षत आणि वैष्णवी, आशिष आणि शम्पा, मौनी रॉय आणि पुनीत, पूजा-रजित , अन्ड्रयी आणि भाविनी, कृतिका आणि साव्हियो, शक्ती मोहन आणि तुषार आणि श्रीसंत आणि स्नेहा़ होय, क्रि केटच्या मैदानावरील लोकप्रिय सितारा श्रीसंत प्रथमच ‘झलक’सारख्या डान्स शोमध्ये स्पर्धक म्हणून उतरलाय!
माधुरीने गप्पा मारताना म्हटलं, ‘झलक’चे परीक्षक म्हणून काम पाहणो नेहमीच आवडत़े कारण कार्यक्र माचे स्वरूप नृत्याशी निगडीत आहे. माधुरीला ‘डान्सिंग क्वीन’ असे विशेषण आहे, पण तरीही तिला स्वत:ला असे वाटते, की अजून डान्समध्ये खूप काही शिकायचे आहे. धूम-3 सिनेमात अवघे काही सेकंद आमीर खानने टॅप डान्स केला, पण त्यासाठी त्याने तब्बल 15 दिवस सराव केला होता़ ह्याच टॅप डान्स आणि बोलेरो, झौक, साल्सा, तांगो, हिप-हॉप अशा अनेक विदेशी, लोकप्रिय डान्सची विविधता पाहायला मिळणार आह़े तेजाब सिनेमात मोहिनीची भूमिका सादर केलेल्या माधुरीला नेमकी टॅप डान्सची मोहिनी पडलीय. हा डान्स शिकण्याची मनापासून इच्छा आहे, पण त्याचा गुरू मात्र मला अजून मिळाला नाही; मी त्याच्या शोधात आहे!
विदेशी नृत्य करताना अनेक साहाय्यक तिला काही कठीण मुद्रा देत होत़े तिला उंचावरून खाली ङोलण्याची स्टेप देखील होती़ मी घाबरले नाही, पण माझी दोन मुलं मात्र अवाक् झालीत़ त्यांनी मला मिठी मारून ‘ममा, यू आर ब्रेव्ह’ अशी शाबासकी दिली आणि मी धन्य धन्य झाले! माधुरीतली आई व्यक्त होत असत़े