मॅगी पुन्हा अडचणीत, बंदीसाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टाच्या दारी
By admin | Published: November 13, 2015 11:26 AM2015-11-13T11:26:45+5:302015-11-13T11:26:45+5:30
मॅग प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेत मॅगीवर बंदी टाकण्याची मागणी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - दिवाळीच्या मुहुर्तावर बाजारपेठेत दाखल झालेली मॅगी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मॅगी प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून मॅगीवर बंदी टाकण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे.
हानिकारक घटकांमुळे ५ जूनरोजी मॅगीवर देशभरात बंदी टाकण्यात आली होती. याविरोधात नॅस्ले इंडियाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टानेही मॅगीला दिलासा देत तीन प्रयोगशाळांमध्ये तपासणी करण्याचे आदेश दिले. या तिन्ही प्रयोगशाळांमधील तपासणीत मॅगी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले व दिवाळीच्या मुहुर्तावर मॅगी पुन्हा बाजारपेठेत दाखल झाली. मात्र अद्यापही मॅगीच्या अडचणी संपुष्टात आलेल्या नाहीत. शुक्रवारी राज्य सरकारच्यावतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.