वेडय़ा मुलांचे हात हिरवे करणारी ‘जादू’
By admin | Published: June 26, 2014 02:42 AM2014-06-26T02:42:32+5:302014-06-26T02:42:32+5:30
बुगुबुगू मान हलवणारा गाण्यातला ‘भोलानाथ’ पाऊस पडेल की नाही, हे सांगू शकत नाही, शाळेभोवती तळं साचल्याने पूर्वी मिळायची ती सुटीची गंमत आता उरली नाही, हे सगळं हल्ली शाळकरी मुलांनाही कळतं.
Next
>मुंबई : बुगुबुगू मान हलवणारा गाण्यातला ‘भोलानाथ’ पाऊस पडेल की नाही, हे सांगू शकत नाही, शाळेभोवती तळं साचल्याने पूर्वी मिळायची ती सुटीची गंमत आता उरली नाही, हे सगळं हल्ली शाळकरी मुलांनाही कळतं.
पहिल्यावहिल्या पावसाच्या पाण्यात कागदाच्या होडय़ा सोडायचा आनंद लुटण्याच्या वयातल्या आपल्या
मुलांना आपण वारसा म्हणून दिली आहे ती दरवर्षी ओढ लावून डोळ्यातून पाणी काढणा:या पावसाची वाट पाहण्याची शिक्षा!
पण आपल्या सुखासाठी सारं सारं ओरबाडणा:या पिढीच्या पोटी जन्माला आली असली तरी आपली मुलं थोडी वेगळी आहेत़़़ ती उन्हाळ्यात तहानल्या पक्ष्यांसाठी पाणी ठेवतात, त्यांच्यासाठी घराच्या बाल्कनीत लाकडी घरटं लटकवण्याचा हट्ट धरतात. त्यांना जंगल आवडतं. मरणा:या वाघांबद्दल त्यांना प्रश्न पडतात, घरात उगीचच लाइट लावून ठेवणा:या आईबाबांना चार गोष्टी सुनावण्याची त्यांची तयारी असत़े़़ आपल्या मुलांना कळतंय की तुटणारी झाडं, तापलेला उन्हाळा, लांबलेला पाऊस ही काही चांगली चिन्हं नव्हेत. आपण काहीतरी करायला हवं़़़
हा ‘काहीतरी करू या’चा भुंगा ज्यांच्या डोक्यात सदानकदा भिरभिरत असतो, अशा धडपडय़ा मुलांसाठी आणि ‘गप्प बस’ म्हणून मुलांच्या या वेडेपणावर पाणी न ओतता, अशा मुलांच्या वेडाला खतपाणी घालणारे आईबाबा आणि शिक्षकांसाठी आजपासून एक खास पान ‘लोकमत’मध्ये सुरू होतं आहे : ‘ग्रीन किड्स’, ‘पर्यावरण’ हा गुळगुळीत झालेला शब्द आणि शाळकरी अभ्यासातलं त्याचं कंटाळवाणं, रटाळ रूप ओलांडून गप्पा-गोष्टी, प्रयोग आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या वाटांनी तुमच्या मुलांना घेऊन जाणारा हा प्रयत्न तीन महिन्यांहून अधिक काळ चालेल. मुलांच्या जिज्ञासेला खतपाणी घालायला उत्सुक असलेले आईबाबा, नातवंडांच्या ‘दुपारच्या उद्योगा’त त्यांचे सवंगडी असलेले आजी-आजोबा आणि पुस्तकांच्या पलीकडचा अनुभव आपल्या विद्याथ्र्यानी घ्यावा, यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक/शाळा या सर्वानाच ‘ग्रीन किड्स’मध्ये सहभागासाठी आम्ही आमंत्रित करतो आहोत. (लोकमत : ग्रीन टीम)
या छोटय़ा मित्रंना घरात कुणाचा ओरडा बसू नये, म्हणून एक छोटी सूचना : ग्रीन किड्सचं पान कापून ठेवण्याआधी घरातल्या सगळ्यांचा पेपर वाचून झालाय ना, हे एकदा विचारून घ्या, काय!!
च्घरी व शाळेत करता येतील अशा धमाल प्रयोगांची माहिती
च् मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळवून देण्याची खास व्यवस्था
च् शाळांना आपल्या ‘हिरव्या प्रयोगां’सह सहभागाची संधी
च्रोजचा अंक न चुकता वाचणा:या आणि संग्रही ठेवणा:या मुलांसाठी विमान सफरीसह मस्त बक्षिसांची लयलूट