मॅग्मोचे 1 जुलैपासून पुन्हा बेमुदत आंदोलन
By admin | Published: June 30, 2014 01:42 AM2014-06-30T01:42:31+5:302014-06-30T01:42:31+5:30
मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये 1क् दिवसांत प्रमुख मागण्यांची पूर्तता केली जाईल,
Next
>मुंबई : मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये 1क् दिवसांत प्रमुख मागण्यांची पूर्तता केली जाईल, या आश्वासनाची पूर्तता मात्र एक महिना उलटून गेला तरीही मागण्या मान्य न झाल्याने 1 जुलैला डॉक्टर दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन आणि सामूहिक राजीनामे देणार असल्याची माहिती मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली. त्याचा परिणाम वैद्यकीय सेवेवर होण्याची शक्यता आहे.
मॅग्मो संघटनेच्या पदाधिका:यांनी 2 जून रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर 4 जून रोजी मॅग्मो संघटनेला चर्चेचे इतिवृत्त मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र अजून एकाही मागणीची पूर्तता करण्यात आलेली नाही. मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघटना असहकार आंदोलन सुरू करणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील सुमारे 12 हजार वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला संघटनेने आंदोलन केले होते. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला होता. मागण्या मान्य होत नसल्यामुळे आंदोलनाच्या बरोबरीनेच सामूहिक राजीनामा देण्याचे संघटनेने ठरविले आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष, सरचिटणीस हे आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणास बसणार आहेत. 1 जून 2क्क्6 पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिका:यांना सहावा वेतन आयोग लागू व्हावा, वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिका:यांना केंद्र शासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणो उच्च वेतन मिळावे, 2क्क्9-1क् मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिका:यांना पूर्वलक्षी लाभ देण्यात यावा, अस्थायी स्वरूपात काम करणा:या सुमारे 789 बीएएमएस व 32 बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांना कायम सेवेत घेण्यात यावे, तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाचगणी येथे मॅग्मो संघटनेच्या मॅगकॉन परिषदेत केलेल्या घोषणोनुसार आरोग्य विभागाचा पुनर्रचना आयोग स्थापन करण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा मॅग्मोच्या 11 मागण्या आहेत. (प्रतिनिधी)