आळंदी येथे चंदनउटीतील माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:44 PM2019-05-07T19:44:59+5:302019-05-07T19:46:26+5:30

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीनां मंगळवारी (दि ७) चंदनउटी लावण्यात आली.

Magnificent crowd of devotees in Chandan uti vitthal frame in Alandi | आळंदी येथे चंदनउटीतील माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

आळंदी येथे चंदनउटीतील माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देचैत्र गौरी पूजन  : विविध धार्मिक कार्यक्रम 

आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात श्रीनां मंगळवारी (दि ७) चंदनउटी लावण्यात आली. श्रींचे वैभवीरूप दर्शना सोबतच चैत्र गौरी पूजनास भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 
 अक्षय तृतीये निमित्त आळंदीत  माउली मंदिरात चैत्र गौरी पूजन, चंदन उटी दर्शन उत्साहात झाले. महिला भाविकांनी कारंजा मंडपात गर्दी करून श्रींचे दर्शन घेत हळदी-कुंकू घेतले. आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात चैत्र गौरी पूजना निमित आकर्षक सजावट करण्यात आली होती. 
श्रीचे गाभा-यात अक्षय तृतीये निमित्त संजीवन समाधीवर चंदन उटीतुन माऊलींचे श्री विठ्ठल रूप परिश्रम पूर्वक अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी साकारले. विविध वस्त्रालंकारांनी सजलेले श्रींचे रूप दर्शनास भाविकांनी गर्दी केली. आळंदी परिसरात साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत विविध नवीन उपक्रम आणि खरेदी केलेल्या वाहनांची पूजा करण्यात आली.
माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत अक्षय तृतीये निमित्त प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या पूजा आणि भाविकांचे दर्शन तसेच महिलांचा हळदी-कुंकू असे कार्यक्रम उत्साहात झाले.
 याप्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ.अभय टिळक यांनी सपत्नीक श्रींचे दर्शन घेतले. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक यांनी संस्थांनच्या प्रथा प्रमाणे धार्मिक महत्व ओळखून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ठेवली. विना मंडपात वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवचन सेवा झाली. संजय लवांडे, सोमनाथ लवंगे, महेश गोखले आदींनी मंदिरातील तसेच भाविकांचे दर्शनाचे नियोजन केले.
 

Web Title: Magnificent crowd of devotees in Chandan uti vitthal frame in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.