महाआघाडीचे सरकार अकरा दिवसांत कोसळणार - राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 03:07 IST2020-02-25T03:06:51+5:302020-02-25T03:07:15+5:30
महाआघाडीचे सरकार आज पडेल की उद्या, हे सांगता येत नाही. ते कधीही कोसळू शकते, असेही ते म्हणाले.

महाआघाडीचे सरकार अकरा दिवसांत कोसळणार - राणे
भिवंडी : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार येत्या ११ दिवसांत कोसळेल, असे भाकित माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी रविवारी भिवंडी येथे केले. खा. कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनासाठी ते भिवंडीत आले होते.
श्री सिद्धीविनायक क्रि केट क्लब व खासदार कपिल पाटील फाऊंडेशनच्यावतीने अंजूर येथे आयोजित केलेल्या खासदार चषक डे-नाईट क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन नारायण राणे यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले. या सामन्यांच्या समारोपाला ११ दिवसांचा अवधी आहे. या समारोप सोहळ्याला भाजपचा मुख्यमंत्री नक्की येईल, असा दावा त्यांनी केला. महाआघाडीचे सरकार आज पडेल की उद्या, हे सांगता येत नाही. ते कधीही कोसळू शकते, असेही ते म्हणाले.
या स्पर्धेत खेळाडूंना २५ बाईकचे बक्षीस आणि आकर्षक खासदार चषक देण्यात येईल. या स्पर्धेच्या समारोपाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी कपिल पाटील, भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील आदी उपस्थित होते.