मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 03:33 PM2020-07-07T15:33:27+5:302020-07-07T15:35:00+5:30
Maha Metro Job Vacancy 2020: मुंबई मेट्रोमध्ये या नोकऱ्या कोणकोणत्या पदांवर निघाल्या आहेत. अर्ज कधी करायचा आहे? याची माहिती खाली दिलेली आहे. याशिवाय अधिकृत जाहिरातीच्या लिंकही देण्यात येत आहेत.
मुंबई : मुंबईमेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (MMRDA) ने मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या पदांवर भरती आयोजित केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in वर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Maha Metro Job Vacancy 2020: मुंबई मेट्रोमध्ये या नोकऱ्या कोणकोणत्या पदांवर निघाल्या आहेत. अर्ज कधी करायचा आहे? याची माहिती खाली दिलेली आहे. याशिवाय अधिकृत जाहिरातीच्या लिंकही देण्यात येत आहेत.
रिक्त जागा...
- टेक्नीशियन 1 -53 जागा
- टेक्नीशियन (सिव्हिल) 1 - 8 जागा
- टेक्नीशियन (सिव्हिल) 2 - 2 जागा
- टेक्नीशियन (एसअँडटी) 1 - 39 जागा
- टेक्नीशियन (एसअँडटी) 2 - 2 जागा
- टेक्नीशियन (ईअँडएम) 1 - 1 जागा
- टेक्नीशियन (एसअँडटी) 2 - 1 जागा
- ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) - 1 जागा
- जूनियर इंजीनियर (स्टोअर) - 1 जागा
- ट्रॅफिक कंट्रोलर - 1 जागा
- हेल्पर - 1 जागा
एकूण जागा - 110
पदांनुसार वेतन (पे स्केल)
- टेक्नीशियन 1 - 25,500 ते 82,100 रुपये प्रति महिना
- टेक्नीशियन (सिव्हिल) 1 - 19,900 से 63,200 रुपये प्रति महिना
- टेक्नीशियन (सिव्हिल) 2 - 25,500 से 81,100 रुपये प्रति महिना
- टेक्नीशियन (एसअँडटी) 1 - 19,900 से 63,200 रुपये प्रति महिना
- टेक्नीशियन (एसअँडटी) 2 - 25,500 से 81,100 रुपये प्रति महिना
- टेक्नीशियन (ईअँडएम) 1 - 19,900 से 63,200 रुपये प्रति महिना
- टेक्नीशियन (ईअँडएम) 2 - 19,900 से 63,200 रुपये प्रति महिना
- ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) - 38,600 से 1,22,800 रुपये प्रति महिना
- जूनियर इंजीनियर (स्टोअर) - 38,600 से 1,22,800 रुपये प्रति महिना
- ट्रॅफिक कंट्रोलर - 38,600 से 1,22,800 रुपये प्रति महिना
- हेल्पर - 15000 से 47,600 रुपये प्रति महिना
अर्ज कसा कराल?
मुंबई मेट्रोतील या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जांची सुरुवात 27 जूनपासूनच केली गेली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै आहे. खुल्या गटासाठी 300 रुपये तर आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना 150 रुपये फी भरावी लागणार आहे. ही फी देखील ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे.
अटी काय?
वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. याशिवाय वयाची अटही वेगवेगळी आहे. याच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करावे.
Mumbai Metro vacancy notification 2020 साठी इथे क्लिक करा....
MMRDA च्या वेबसाइटलर जाण्यासाठी इथे क्लिक करा...
SBI देखील भरती करणार...
भारतीय स्टेट बँकेने पुढील 6 महिन्यांमध्ये 2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या योजनेविषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये चांगला विकास होण्यासाठी आणि बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नोकरी विषयक आणि फायद्याच्या अन्य बातम्या...
सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती
लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज
गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार
FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच
विद्यापीठांच्या परिक्षांची घोषणा झाली, या महिन्यात होणार; यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले