विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच आघाडीवर; भाजपला जोरदार धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 03:18 AM2020-12-04T03:18:57+5:302020-12-04T08:07:36+5:30

धुळे-नंदुरबारमध्ये मात्र फुलले कमळ, राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या या पहिल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

Maha Vikas leads in Legislative Council elections; Strong push to BJP | विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच आघाडीवर; भाजपला जोरदार धक्का

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच आघाडीवर; भाजपला जोरदार धक्का

googlenewsNext

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ अशा सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुढे आहे. तर धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अमरीश पटेल विजयी झाले आहेत. अंतिम फेरीअखेर आघाडीवरचे सर्व उमेदवार विजयी झाले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारसाठी मोठा दिलासा असेल.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या या पहिल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल यांचा विजय होताच भाजप नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.   पटेल यांनी ३३२ मते मिळवीत विजयाची हॅट् ट्रिक केली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना अवघी ९८ मते मिळाली.  

मतमोजणीचे चित्र

धुळे-नंदुरबार स्था. स्वराज्य
 अमरीश पटेल     (भाजप)    ३३२ 
 अभिजित पाटील     (कॉंग्रेस)    ९८

औरंगाबाद पदवीधर
 सतीश चव्हाण     (राष्ट्रवादी)    २७२५०
 शिरीष बोराळकर     (भाजप)    ११२७२

पुणे पदवीधर 
 अरुण लाड     (राष्ट्रवादी)     
 संग्राम देशमुख     (भाजप)    

पुणे शिक्षक मतदारसंघ
 जयंत आसगावकर     (कॉंग्रेस)     
 दत्तात्रय सावंत     (अपक्ष)    

नागपूर पदवीधर
 ॲड. अभिजित वंजारी     (कॉंग्रेस)    २४११४
 संदीप जोशी     (भाजप)    १६८५२
अमरावती शिक्षक मतदारसंघ
 किरण सरनाईक     (अपक्ष)    ६०८८
 श्रीकांत देशपांडे     (शिवसेना)    ५१२२

Web Title: Maha Vikas leads in Legislative Council elections; Strong push to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.