महाबळेश्वरमध्ये मातीशिवाय उगवतेय स्ट्रॉबेरी!

By admin | Published: January 10, 2016 02:34 AM2016-01-10T02:34:10+5:302016-01-10T02:34:10+5:30

महाबळेश्वरच्या तांबड्या मातीत पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचे आता जमिनीत लागवड न करताही उत्पादन घेणे शक्य झाले आहे. ‘हायड्रोफोनिक’ तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी स्ट्रॉबेरीचे

Mahabaleshwar rising strawberry without soil! | महाबळेश्वरमध्ये मातीशिवाय उगवतेय स्ट्रॉबेरी!

महाबळेश्वरमध्ये मातीशिवाय उगवतेय स्ट्रॉबेरी!

Next

- सचिन काकडे,  सातारा
महाबळेश्वरच्या तांबड्या मातीत पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचे आता जमिनीत लागवड न करताही उत्पादन घेणे शक्य झाले आहे. ‘हायड्रोफोनिक’ तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी स्ट्रॉबेरीचे दुपटीने उत्पादन घेत आहेत. राज्यात सर्वप्रथम हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग भिलार येथे करण्यात आला.
हायड्रोफोनिक म्हणजे, स्ट्रॉबेरी रोपांची लागवड जमिनीत न करता कुंड्या अथवा ट्रफमध्ये केली जाते. त्यात मातीऐवजी नारळाची भुकटी टाकली जाते. रोपांना आवश्यक असणारी मुलद्रव्ये ज्यामध्ये एनपीके (प्रायमरी), कॅल्शिअम, मॅग्नेशिअम सल्फर (सेंकडरी) तसेच लोह, बोरॉन, थ्रिंक, कॉपर, अमोनिअम, मॉली या सुक्ष्म अन्नद्रव्यांची पाण्याच्या माध्यमातून पूर्तता केली जाते. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची ९० टक्के बचत होते. या तंत्रज्ञानाच्या स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी गुंठा ४० हजार रुपये इतका खर्च येतो.
हायड्रोफोनिक स्ट्रॉबेरीचा रंग, चव व सर्व गुणधर्म हे जमिनीतील स्ट्रॉबेरीप्रमाणेच असतात. यामुळे उत्पादनात दुपटीने वाढ होत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे. भिलार येथील किसन भिलारे यांनी राज्यात सर्वप्रथम याचा अवलंब करून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले. प्रारंभी दोन गुंठे क्षेत्रात केलेला हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर तालुक्यातील २० शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान अवलंबविले.

अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलाचा स्ट्रॉबेरीवर परिणाम होतो. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती आहे. त्यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात घट झाली आहे.
- किसन भिलारे, प्रगतशील शेतकरी

Web Title: Mahabaleshwar rising strawberry without soil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.