आषाढीनिमित्त नागनाथ मंदिरात महाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2016 03:48 PM2016-07-15T15:48:41+5:302016-07-15T15:48:41+5:30
येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री नागनाथ मंदिरात आलेल्या विठ्ठल रुक्मिनी यांची महाअभिषेक करून पूजा करण्यात दिवसभर गोकर्ण माळावर व मंदिरात दर्शनासाठी सुमारे पन्नास हजार भाविकांनी गर्दी केली होती.
ऑनलाइन लोकमत
औंढा नागनाथ, दि. 15 - येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री नागनाथ मंदिरात आलेल्या विठ्ठल रुक्मिनी यांची महाअभिषेक करून पूजा करण्यात दिवसभर गोकर्ण माळावर व मंदिरात दर्शनासाठी सुमारे पन्नास हजार भाविकांनी गर्दी केली होती.
सकाळी 6 वा स. सचिव. विधा नामदेव पवार, विश्वस्त डॉ. पुरुषोत्तम देव, प्रा. देविदास कदम यांचा हस्ते महापूजा करण्यात आली. या वेळी सचिव गजानन वाखरकर, डॉ. विलास खरात उपस्थित होते. पुरोहित हरिहर भोपी निळकंठ देव बंडू पंडित पदमाक्ष पाठक यांनी पूजा केली. सकाळी ९वा संत नामदेव सभामंडपात किर्तनाचा कार्यक्रम घेतला. यामध्ये हभप उत्तम देशमुख, प्रभाकर पाटील, गिरीश इखे, प्रल्हाद निशानकर, नागनाथ पाठक, पंडित धारखेडकर, प्रकाश लांबडे व पंचक्रोशीतील भजनी मंडळी सहभागी झाले होते. तसेच संस्थानचा वतीने भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांचा मार्गदर्शनानुसार प्रसन्न कुमार मोरे व पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. औंढा नागनाथ येथील वनविभागामध्ये डोंगरावर असलेल्या माहादेवाचे आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दि केली होती .वर्षातुन एकदळच दर्शन घेण्यासाठी भावीक गर्दी करतात. पंचक्रोशीतिल १०ते १५ किलो मिटर वरुन भावीक आनवणी पायांनी येथे आल्याचे दिसून आले. वन विभागाचा वतीने या ठिकाणी जाण्यासाठी रस्यांची व्यवस्था करण्यात आली होती या ही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.